Team My Pune City – किरकोळ वैमनस्यातून टोळक्याने एका तरुणावर( Baner Crime News) जीवघेणा हल्ला केल्याची घटना बाणेर परिसरात उघडकीस आली आहे. पाईप व शस्त्राने केलेल्या बेदम मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
ही घटना रविवारी (दि. 24) रात्री साडेदहाच्या सुमारास पॅनकार्ड क्लब रस्त्यावर ( Baner Crime News)घडली. जखमी तरुणाचे नाव समर्थ योगेश ताम्हाणे (वय 17, रा. धनकुडे वस्ती, बाणेर) असे असून, त्यानेच बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताम्हाणेच्या मित्राचा आरोपींशी याआधी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. वाद मिटवण्याच्या बहाण्याने आरोपींनी ( Baner Crime News) ताम्हाणे व त्याच्या मित्राला पॅनकार्ड क्लब रस्त्यावर बोलावून घेतले. तिथे पोहोचताच आरोपींनी ताम्हाणेच्या मित्राला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर ताम्हाणेच्या डोक्यात लोखंडी पाईप घालून जबर मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता एका आरोपीने त्याच्यावर शस्त्राने वार केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Talegaon PWD : ‘पीडब्ल्यूडी’च्या निषेधार्थ तळेगावकरांचे ५ ऑक्टोबरला आंदोलन
या प्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात संबंधित टोळक्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा ( Baner Crime News) दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, किरकोळ वादातून गंभीर हल्ल्यांच्या घटना शहरात वाढीस लागल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच कोंढवा परिसरात आर्थिक वादातून दाम्पत्याने एका 14 वर्षीय मुलावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले ( Baner Crime News) आहे.