situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Baner Crime : बांधकामाच्या खोट्या परवानग्या दाखवून 5.37 कोटींची फसवणूक

Published On:
Pune Crime News 02 June 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – पीएमआरडीए आणि महापालिका यांच्याकडून मंजूर परवानगीपेक्षा अधिक मजल्यांच्या बांधकामासाठी परवानगी असल्याचे दाखवून ग्राहकांकडून 5.37 कोटी रुपये घेत कोणतेही बांधकाम न करता फसवणूक केली. हा प्रकार जानेवारी 2020 ते मे 2025 या कालावधीत डेरान हिल्स बाणेर (Baner Crime) येथे घडला.

याप्रकरणी निखिल ज्ञानेश्वर फालक (32, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उमंग भारतभूषण मदान, एक महिला आणि प्रकाश मोकाशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hoarding Collapsed : सणसवाडीत वळवाच्या पावसात होर्डिंग कोसळले; सरदार रविंद्र सिंह यांचा PMRDA वर भ्रष्टाचाराचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेरान प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक असलेल्या आरोपींनी डेरान बिझनेस स्क्वेअर (Baner Crime) या बांधकाम प्रकल्पासाठी पीएमआरडीए कडून चार मजल्यांची परवानगी घेतली आहे. तसेच डेरान राईस अँड प्रोस्पर या बांधकाम प्रकल्पाकरिता पिंपरी चिंचवड महापालिकेची पाच मजल्यापर्यंत बांधकाम करण्याची परवानगी घेतली आहे. असे असताना त्यांनी बांधकाम प्रकल्पाबाबत परिपूर्ण माहिती न देता ग्राहकांना 10 मजल्यापर्यंत परवानगी प्राप्त करण्यात येत असल्याची खोटी माहिती दिली.

‘आयुका’मधील दिवस, संशोधनाचा, भरपूर कामाचा…!

फिर्यादी फालक आणि इतर व्यक्तींना दोन, पाच, नऊ आणि दहाव्या मजल्यावरील सदनिका व दुकाने विक्री करण्याचे आश्वासन दिले. फालक आणि इतर ग्राहकांकडून पाच कोटी 37 लाख 55 हजार 759 रुपये घेतले. आरोपींनी ग्राहकांना रक्कम स्वीकारल्याच्या पावत्या, वाटप पत्र दिले. मे 2020 पर्यंत ताबा देण्याचे तोंडी आश्वासन (Baner Crime) देण्यात आले होते.

प्रत्यक्षात कोणतेही बांधकाम पूर्ण न करता फालक आणि इतर ग्राहकांकडून घेतलेली रक्कम परत न करता तसेच गुंतवणूकदार यांच्याशी कोणताही रजिस्टर नोंदणी विक्री करार न करता रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फसवणूक केली.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On