Team My Pune City – नाना पेठ परिसरातील डोके (Bandu Andekar) आतालीमीजवळ बेकायदा फलक (फ्लेक्स) लावल्याप्रकरणी कुख्यात आंदेकर टोळीविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या कुटुंबीयांवर कारवाई करण्यात आली आहे.
समर्थ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंदेकर टोळीने (Bandu Andekar) आनाना पेठेतील इनामदार कॉम्प्लेक्स परिसरात परवानगीशिवाय फलक लावले होते. उच्च न्यायालयाने शहरातील बेकायदा फलकांवर बंदी घालूनही आंदेकर टोळीने आदेशाचा भंग केला. या कृतीमुळे शहराचे विद्रुपीकरण झाल्याचा ठपका ठेवून महापालिकेतील अधिकाऱ्यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
Pune : लोककलांचे विकृतीकरण थांबणे आवश्यक – डॉ. सदानंद मोरे
या प्रकरणी बंडू आंदेकर, कृष्णा बंडू आंदेकर, माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर, शिवम, अभिषेक, शिवराज उदयकांत आंदेकर, सोनाली वनराज आंदेकर आणि प्रियंका कृष्णा आंदेकर (Bandu Andekar) आयांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याशिवाय बेकायदा फलकांबाबत आणखी एका फिर्यादीवरून बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकरसह पाच जणांवर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, एका मंडळाच्या पदाधिकाऱ्यावरही फलक लावल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, आंदेकर टोळीच्या बेकायदा बांधकामांवर महापालिकेने नुकतीच कारवाई केली होती. या कारवाईदरम्यान पत्र्याचे शेड, तात्पुरती बांधकामे, तसेच गणेश पेठेतील नागझरी भागातील बेकायदा सुरू असलेल्या मासळी बाजारावर देखील हातोडा चालविण्यात आला.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार सचिन गायकवाड करीत (Bandu Andekar) आहेत.