situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Balgandharva Theatre : बालगंधर्व रंगमंदिरातील एसीमध्ये झाला किरकोळ स्फोट; सुदैवाने मोठी हानी टळली

Published On:
Balgandharva Theatre

Team My Pune City – जंगली महाराज रोडवरील ( Balgandharva Theatre) प्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदिरात रविवारी रात्री एअर कंडिशनिंग (AC) प्रणालीत झालेल्या किरकोळ स्फोटामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटानंतर सभागृहात दाट धूर पसरला; मात्र प्रसंगावधान राखत कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई केल्याने कोणतीही जीवितहानी वा मालमत्तेची हानी टळली.

ही घटना रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ( Balgandharva Theatre) घडली. त्यावेळी रंगमंचावर एक मराठी व्यावसायिक नाट्यप्रयोग सुरू होण्याआधीच तांत्रिक कर्मचाऱ्यांनी एसी प्लांटमधून धूर निघत असल्याचे पाहिले. प्रेक्षकांचे आगमन होण्याआधीच हा प्रकार घडल्याने संभाव्य मोठा अपघात टळला.

Today’s Horoscope, Monday : आजचे राशीभविष्य : सोमवार, ३ नोव्हेंबर २०२५

मिळालेल्या माहितीनुसार, सभागृहाच्या बाल्कनी भागाजवळ असलेल्या एसी प्लांटमध्ये अचानक छोटा स्फोट झाला. त्यातून दाट धूर पसरू लागला. उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्वरित वीजपुरवठा बंद करून सभागृहातील सर्वांना बाहेर काढले. काही मिनिटांत धूर बाहेर काढण्यासाठी वायुविजनची व्यवस्था करण्यात आली.

CCTV Removal Warning : गहुंजे ते कुसगाव लोणावळा दरम्यानचे सीसीटीव्ही कॅमेरे हटवावेत, अन्यथा आंदोलन करु – स्थानिक संघटनांचा इशारा

रंगमंदिरातील एका अधिकाऱ्याने सांगितले, “कर्मचाऱ्यांनी वेळेत आणि योग्य पद्धतीने कारवाई केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. कोणत्याही वस्तूचे मोठे ( Balgandharva Theatre) नुकसान झाले नाही.”

धूर पूर्णपणे निघून गेल्यानंतर आणि सुरक्षा सुनिश्चित झाल्यानंतरच प्रेक्षकांना सभागृहात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर नियोजित नाट्यप्रयोग काही वेळ उशिरा सुरू करण्यात आला.

घटनेनंतर बाळगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक राजेश कांबळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र ते उपलब्ध झाले नाहीत.

दरम्यान, या स्फोटाचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासानुसार एसी प्लांटमधील तांत्रिक बिघाडामुळे हा स्फोट झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या प्रकारात कोणतीही जखमी व्यक्ती ( Balgandharva Theatre) नाही.

Follow Us On