Team MyPuneCity – कोथुर्णे विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब मसुरकर (Balasaheb Masurkar) तर उपाध्यक्षपदी दादु कदम यांची बिनविरोध निवड झाली.
मावळते अध्यक्ष यशवंत बोडके व उपाध्यक्ष गबळू काळे यांनी ठरलेल्या कालखंडात राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आल्याने त्यांची सोसायटीच्या अध्यक्षपदी मसुरकर (Balasaheb Masurkar) बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी कदम यांची निवड करण्यात आली. ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी राकेश निखारे व सचिव रामदास पाठारे, संदिप साबळे यांच्या यांनी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे.
Kamshet News : कामशेतमध्ये ३० टक्के करवाढ रद्द : ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश
यावेळी संचालक ज्ञानेश्वर निंबळे, लक्ष्मण काळे, वाघू दळवी, संभाजी काळे, बाळु दळवी,गबळु काळे, मथाबाई मोहोळ,यशवंत बोडके,सरपंच सुरेश दळवी,ज्ञानदेव सोनवणे, राम नढे, विठ्ठल दळवी भरत दळवी, संजय मोहोळ, रमेश कालेकर बाळासाहेब मोहोळ, भिमराव दळवी, सुर्यकांत दळवी,संजय दळवी, शिवाजी निंबळे, नामदेव दळवी, मारुती दळवी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना बाळासाहेब मसुरकर (Balasaheb Masurkar) म्हणाले की, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात येईल.