Team My Pune City – पुण्यातील मध्यवर्ती बाजीराव रोडवर ( Bajirao Road Murder) दुपारच्या सुमारास झालेल्या खुनाच्या घटनेने शहर हादरले आहे. मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या या ठिकाणी, लोकांच्या उपस्थितीतच एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला.
मृत तरुणाचे नाव मयंक खराडे असून तो आंबील ओढा परिसरात राहत होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीच्या शोधासाठी मोहीम सुरू ( Bajirao Road Murder) केली आहे.
Santosh Bhegde : माजी नगरसेवक संतोष भेगडे यांच्या वतीने तुळजापूर, अक्कलकोट दर्शन यात्रा
पुण्यातील गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच कोंढवा परिसरात भर दुपारी गणेश काळे याची हत्या झाली होती. त्यानंतर आता पुन्हा गजबजलेल्या भागात झालेल्या या खुनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले (Bajirao Road Murder) आहे.



















