Team My Pune City –बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये शेतकरी आंदोलन सुरु आहे. या शेतकरी आंदोलनामुळे सरकार आणि आंदोलकांमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे.सरकारने चर्चेसाठी मुंबईला येण्याचं आवाहन केलं होतं, मात्र बच्चू कडू यांनी हे अवाहन फेटाळून लावत नागपूरमध्येच बैठक घेण्याची मागणी केली आहे.आंदोलन सोडून मुंबईला येणार नाही’, अशी भूमिका आमदार बच्चू कडू यांनी घेतली आहे. चर्चेसाठी मुंबईला गेल्यास पोलीस दडपशाहीने आंदोलन गुंडाळले जाईल, अशी भीती कडू यांनी व्यक्त केली आहे.
आंदोलकांच्या मागण्या संदर्भात सरकारसोबत चर्चा सुरु असून कुणीही रेल्वे रोको आंदोलन करू नये, असे आवाहन बच्चू कडूंनी केलं आहे. आज 4 वाजताच्या सुमारास राज्याचे गृहराज्य मंत्री पंकज भोयर आणि अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे सरकारचे प्रतिनिधी म्हणून आंदोलन स्थळी जाणार आहे. ते तिथे बच्चू कडूंशी चर्चा करणार आहे.
Vadgaon Maval: मावळ तालुक्यात ५ पक्ष एकत्र — ‘महाविकासआघाडी’ म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार
Murder : जमिनीच्या वादातून तरुणाचा गळा चिरुन खून;आरोपींना नानोली भागातून घेतले ताब्यात
नागपूरमध्ये आंदोलक आणि शेतकरी रेल्वे ट्रॅकवर उतरले होते. जामठा स्टेडियम परिसरात शेतकऱ्यांनी रेल रोखो आंदोलन सुरु केले होते.यामुळे काही वेळासाठी रेल्वेची वाहतूक खोळंबली होती. आंदोलकांच्या मागण्या संदर्भात सरकारसोबत चर्चा सुरु असून कुणीही रेल्वे रोको आंदोलन करू नये, असे आवाहन बच्चू कडूंनी केलं होतं. त्यांनतर आंदोलकांनी हे रेल्वेट्रॅक मोकळा केला आहे.
बच्चू कडू सरकारकडे या मागण्या …
शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी जाहीर करावी.
शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलाला समान निकष लाऊन 5 लाख रु. अनुदान द्यावे.
कृषी मालाला हमी भावावर 20% अनुदान देण्यात यावे.
पेरणी ते कापणीचा सर्व खर्च MREGS मधुन करावा.
दिव्यांग, निराधार, विधवा भगिनी व अनाथांना मासिक 6 हजार रुपये मानधन मिळावे-
नागपुर – गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा.
मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे


















