Team MyPuneCity – सोशल मीडियावर कोणता नवीन ट्रेंड कधी येईल (Baby version trend) याचा भरोसा नाही.Ghibli नंतर आता बेबी वर्जन व्हिडीओचा ट्रेण्ड सोशल मीडियावर चालू झाला आहे. सोशल मीडियावर बेबी वर्जन व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या नवीन ट्रेंडमध्ये प्रसिद्ध व्यक्तींचे बेबी वर्जन व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.
हे व्हिडीओ फार क्यूट दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे व्हिडीओ एका मजेदार ट्रेंडचा भाग बनले आहेत. यामध्ये विविध भाषेतील चित्रपटातील संवाद घेत अभिनेता,अभिनेत्री यांचे बेबी वर्जन व्हिडीओ व्हायरल होत आहेत. तसेच राजकारणातील प्रसिद्ध व्यक्तींचे भाषणांचे सुद्धा बेबी वर्जन व्हिडीओ तयार होत आहेत आणि लोकांच्या पसंतीस पडत (Baby version trend) आहेत.
MLA Sunil Shelke : आमदार सुनील शेळके यांचा लोणावळा दौरा; विविध विकास प्रकल्पांचा घेतला आढावा
या बेबी वर्जन व्हिडीओ मधून काही पॉलिटिक्स वॉर होताना दिसत असला तरी राजकारणातील प्रसिध्द व्यक्तींचे लूक मात्र नागरिकांचे लक्ष वेधत आहेत.तर काही चित्रपटातील विनोदी संवाद घेत त्या अभिनेत्यांचे बेबी वर्जन व्हिडिओ बनवले जात आहेत.ते मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत.प्रसिद्ध व्यक्तींचा तो लूक लोकांच्या पसंतीस पडत आहे. विविध प्रतिक्रिया त्यावर नागरिक देत आहेत.तसेच काही नागरिक स्वतः चे बेबी वर्जन व्हिडिओ बनवत शेअर करत (Baby version trend) आहेत.