Team My Pune City –महाराष्ट्र सरकारच्या नव्या निर्णयानुसार मुंबई आणि पुणे शहरांत(Baba Kamble) ई-बाईक टॅक्सी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबतच, राज्य परिवहन प्राधिकरणाने ईलेक्ट्रिक वाहनांमधील परवाना प्राप्त दुचाकी ॲग्रीगेटर धारकांसाठी भाडे निश्चिती बंधनकारक केली असून, पहिल्या 1.5 किमी साठी 15 रुपये भाडे ठरविण्यात आले आहे.
हा निर्णय ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी गंभीर धक्का असल्याचे फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी म्हटले. त्यांच्या मते, भांडवलदारांचे हित जोपासण्यासाठी हा निर्णय घेतल्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला गंभीर नुकसान होईल. सरकारने ऑटो रिक्षा-टॅक्सी चालकांशी कोणतीही चर्चा न करता हा निर्णय घेतल्याने राज्यातील लाखो चालक-मालकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होणार आहे, बेरोजगारी वाढण्याची भीती आहे.
Maval: शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर; मावळ तालुका प्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती
Pune: ‘पुरुषोत्तम’चा शुक्रवारी पारितोषिक वितरण समारंभ;नाना पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती

सध्या महाराष्ट्रात 20 लाख ऑटो रिक्षा चालक-मालक आणि 5 लाखांहून अधिक टॅक्सी-कॅब चालक-मालक आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षा परवान्यांची संख्या 45,000 वरून 1 लाख 70 हजारांवर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत ई-बाईक टॅक्सीला परवानगी देणे म्हणजे “एका भाकरीसाठी दहा वाटेकरी” अशी परिस्थिती निर्माण करणे आहे, असे डॉ. कांबळे यांनी स्पष्ट केले.
ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या वतीने लवकरच राज्यव्यापी बैठक आयोजित करून आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे. सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही, तर तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.