Team My Pune City – नाना पेठ परिसरात झालेल्या ( Ayush Komkar Murder Case)आयुष कोमकर खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बंडू आंदेकरसह १२ आरोपींना सोमवारी येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर विशेष न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले होते.
५ सप्टेंबर रोजी आयुष कोमकर याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आला होता. तपासात ही घटना माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी घडल्याचे समोर आले. आयुष हा बंडू आंदेकरचा नातू असून, वनराज आंदेकर ( Ayush Komkar Murder Case) खूनप्रकरणात आयुषचा वडील गणेश कोमकर याला अटक झाली होती. त्यानंतर बंडू आंदेकरने आयुषच्या खुनाचा कट रचल्याचा आरोप आहे.या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
Rashi Bhavishya 30 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (७०), तुषार नीलंजय वाडेकर (२७), स्वराज नीलंजय वाडेकर (२३), अमन युसूफ पठाण (२५), सुजल राहुल मेरगु (२०), यश सिद्धेश्वर पाटील (१९), अमित प्रकाश पाटोळे (१९), शिवम उर्फ शुभम उदयकांत आंदेकर (३१), अभिषेके उदयकांत आंदेकर (२१), शिवराज उदयकांत आंदेकर (२९), कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (३६), आणि मुनाफ रिजाय पठाण (२८). सर्व आरोपी नाना पेठ परिसरातील रहिवासी आहेत.विशेष न्यायाधीशांनी आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली असून, पुढील तपासासाठी त्यांची रवानगी येरवडा कारागृहात ( Ayush Komkar Murder Case) करण्यात आली आहे.