Team My Pune City – औंध परिसरात एका वरिष्ठ शासकीय ( Aundh Crime News ) अधिकाऱ्यावर रिक्षाचालकाने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना 17 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास भाले चौक येथे घडली. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अधिकारी (वय 44) हे केंद्र सरकारच्या एका संशोधन व विकास संस्थेमध्ये संयुक्त संचालक पदावर कार्यरत आहेत. घटनेच्या वेळी ते स्वतःच्या गाडीतून घरी जात होते. भाले चौकातील सिग्नल हिरवा झाल्यानंतरही समोर उभा असलेला रिक्षाचालक वाहन न हलवल्याने त्यांनी हॉर्न वाजवला.
Akurdi News : आकुर्डी परिसरात चाकू हातात घेऊन फिरणारा ‘जोकर’ पोलिसांच्या ताब्यात
यावरून रिक्षाचालक संतापला आणि गाडी अडवून पीडित अधिकाऱ्याला अडवले. ( Aundh Crime News ) मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अधिकारी (वय 44) हे केंद्र सरकारच्या एका संशोधन व विकास संस्थेमध्ये संयुक्त संचालक पदावर कार्यरत आहेत. घटनेच्या वेळी ते स्वतःच्या गाडीतून घरी जात होते. भाले चौकातील सिग्नल हिरवा झाल्यानंतरही समोर उभा असलेला रिक्षाचालक वाहन न हलवल्याने त्यांनी हॉर्न वाजवला. यावरून रिक्षाचालक संतापला आणि गाडी अडवून पीडित अधिकाऱ्याला अडवले.
यानंतर रिक्षाचालक गाडीतून उतरला, शिवीगाळ केली आणि आपल्या वाहनातील ( Aundh Crime News )सिमेंटचा गट्टू उचलून अधिकाऱ्याच्या डोक्यात मारला. स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न करताना अधिकाऱ्याचा उजवा हात गंभीर जखमी झाला व त्यात फ्रॅक्चर झाले. त्या वेळी परिसरातील काही नागरिकांनी त्वरित हस्तक्षेप करून आरोपीला पकडले आणि पोलिसांना माहिती दिली.
जखमी अधिकाऱ्याला तात्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार ( Aundh Crime News ) पूर्ण करून रुग्णालयातून सुटकेनंतर अधिकाऱ्यांनी गुरुवारी औपचारिक तक्रार नोंदवली.
आरोपी रिक्षाचालक हा कोथरूड परिसरात राहणारा 21 वर्षीय तरुण असून त्याच्यावर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विनाअनुमती अडथळा निर्माण करणे, गंभीर दुखापत करणे आणि धमकावणे अशा कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“आरोपीला तपासासाठी आवश्यकतेनुसार पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे नोटीस देण्यात आली आहे,” अशी माहिती चतुःश्रृंगी पोलिसांनी ( Aundh Crime News ) दिली.