situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Attack on Nilesh Ghare : निलेश घारे यांच्या मोटारीवर गोळीबार प्रकरणी तिघांना अटक

Published On:
Warje Firing

Team MyPuneCity – युवासेनेचे पुणे जिल्हा प्रमुख नीलेश घारे यांच्या गणपती गाथा, वारजे येथील कार्यालयासमोर उभी असलेल्या कारवर अज्ञात दुचाकीस्वारांनी गोळीबार केल्याची घटना १९ मे २०२५ रोजी मध्यरात्री घडली होती. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा (Attack on Nilesh Ghare) कसून तपास करत वारजे माळवाडी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे.

या गुन्ह्याचा (Attack on Nilesh Ghare) तपास करताना वारजे माळवाडी पोलिस स्टेशनच्या दोन पथकांसह गुन्हे शाखा युनिट ३ आणि दरोडा प्रतिबंधक पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी संयुक्तरित्या तपास सुरु केला. पोलिस उपनिरीक्षक संजय नरळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरातील १५० ते २०० सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच गोपनीय माहितीदारांच्या साहाय्याने आरोपींचा शोध घेतला.

तपासात उघडकीस आले की, अजय उर्फ बगली रविंद्र सपकाळ (वय २५, रा. मनपा शाळेसमोर, रामनगर, वारजे) आणि त्याचा साथीदार हे मोटारसायकलवरून येऊन नीलेश घारे यांच्या कार्यालयासमोर उभ्या असलेल्या गाडीवर गोळीबार (Attack on Nilesh Ghare) करून पळाले होते.

या गुन्ह्यात त्यांना शुभम संपत खेमणार (वय २७, रा. रुणवाल पॅनोरमा, बिल्डिंग नं. ३, फ्लॅट नं. ७, वारजे माळवाडी) आणि सचिन अनिल गोळे (वय २७, रा. रुणवाल मिडोज, बिल्डिंग नं. १३, फ्लॅट नं. २१, वारजे माळवाडी) यांनी मदत केली होती.

शुभम खेमणार याने अजय सपकाळ व त्याच्या साथीदाराला डोणजे, कोल्हेवाडी येथून थार गाडीतून आणून रघुनंदन हॉलजवळ उतरवले होते. त्यानंतर सचिन गोळे याने फायरिंगसाठी स्वतःची दुचाकी आरोपींच्या ताब्यात दिली होती. या दुचाकीवरून अजय सपकाळ व त्याच्या साथीदाराने नीलेश घारे यांच्या गाडीवर फायरिंग (Attack on Nilesh Ghare) केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या प्रकरणात आरोपी अजय सपकाळ, शुभम खेमणार आणि सचिन गोळे यांना २५ मे रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना २९ मे २०२५ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

संपूर्ण कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, अंमलदार शरद वाकसे, संजीव कळंबे, अमित शेलार, ज्ञानेश्वर चित्ते, सागर कुंभार, बालाजी काटे, निखील तांगडे, योगेश वाघ, अमित जाधव, गणेश शिंदे यांच्या पथकाने केली.

पोलिसांकडून या गुन्ह्यामागील कारणमीमांसा आणि या हल्ल्याचे राजकीय धागेदोरे आहेत का, याचा सखोल तपास सुरु आहे.

Follow Us On