Team My Pune City – कोंढवा परिसरात मध्यरात्रीपासून ( Kondhwa ATS Raid) महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस), पुणे शहर पोलीस आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणावर संयुक्त छापेमारी मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमुळे परिसरात प्रचंड हालचाल व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Rashi Bhavishya 9 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कोंढव्यातील १८ ठिकाणी एकाचवेळी शोधमोहीम सुरू केली असून त्यामध्ये अशोका म्यूज सोसायटीचा समावेश आहे. हीच ती सोसायटी आहे जिथे सन २००८ मध्ये इंडियन मुजाहिदीन (IM) या दहशतवादी संघटनेचा नियंत्रणकक्ष (कंट्रोल रूम) व केंद्र उध्वस्त करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आजची छापेमारी विशेष लक्षवेधी ( Kondhwa ATS Raid) ठरत आहे.
Talegaon Dabhade: इंद्रायणी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात
या मोहिमेदरम्यान परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याचे सूत्रांकडून समजते. मात्र, अधिकृतरीत्या पोलिसांनी या कारवाईविषयी कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली ( Kondhwa ATS Raid) नाही.
एटीएस व इतर सुरक्षा यंत्रणांकडून संपूर्ण ऑपरेशन अत्यंत गोपनीय ठेवण्यात आले असून, दहशतवादाशी संबंधित तपासाचा धागा असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, चौकशी पूर्ण झाल्यानंतरच अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात येईल.
या कारवाईमुळे पुणेच नव्हे तर संपूर्ण राज्य आणि देशभरातही चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. कोंढवा परिसरात अद्यापही पोलिसांची हालचाल सुरू असून, नागरिकांना शांतता राखण्याचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले ( Kondhwa ATS Raid) आहे.