situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

ATS : पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये आढळली अल-कायदा संबंधित माहिती ; एटीएसचा तपास सुरू

Published On:
ATS

Team My Pune City – राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) ताब्यात ( ATS) घेतलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या लॅपटॉपमधून अल-कायदा या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित दस्तऐवज आणि बॉम्बनिर्मितीविषयीची माहिती आढळून आली आहे. प्राथमिक तपासात आरोपी गेल्या काही काळापासून अतिरेकी विचारसरणीचे साहित्य वाचत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात एटीएसने त्याच्या डिजिटल डिव्हाइसचा तपास सुरू केला असून, संभाव्य संपर्क आणि नेटवर्कचा शोध घेतला जात आहे.

Lonvala Crime News : 10 रुपयांच्या किरकोळ वादातून दुकानदाराला मारहाण 

गुप्ततेच्या अटीवर बोलताना एका वरिष्ठ एटीएस अधिकाऱ्याने सांगितले की, “आरोपीच्या लॅपटॉपमध्ये ‘अल-कायदा’ मासिकातील एके-४७ रायफलच्या वापराबाबतची माहिती आणि स्फोटक तयार करण्याच्या तंत्राविषयीचे तपशीलवार दस्तऐवज सापडले आहेत. आमच्या प्राथमिक चौकशीतून दिसून येते की, तो बराच काळ अशा प्रकारचे अतिरेकी साहित्य वाचत होता. त्याच्या डिव्हाइसवरील सामग्री ही संघटनेच्या विचारसरणी व कार्यपद्धतीचा प्रचार करणारी आहे,” असे त्यांनी सांगितले.

Wildlife Photography Exhibition : निसर्गप्रेमींसाठी पर्वणी ; पुण्यात ‘फेदरअन्‌टेल’ वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन

अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हंगरगेकर गेल्या काही वर्षांपासून ( ATS) पुण्यातील कोंढवा परिसरात वारंवार ये-जा करत होता. त्या दरम्यान त्याने काही तरुणांशी संपर्क साधला होता. या तरुणांपैकी काही जण अल-शबाबसह पदघा (ठाणे) व रतलाम (म.प्र.) परिसरात कार्यरत अतिरेकी मॉड्युल्सशी संबंधित असावेत, असा संशय तपास अधिकाऱ्यांना आहे.

एटीएसने मंगळवारी आरोपीच्या पत्नीची देखील चौकशी केली. मात्र, ती आपल्या पतीच्या कथित कारवायांविषयी अनभिज्ञ असल्याचे तिने सांगितले ( ATS) आहे. आरोपी हंगरगेकर हा कळ्याणीनगरमधील एका खासगी सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत असून, त्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे २५ लाख रुपये असल्याची माहिती मिळाली आहे.

एक वरिष्ठ एटीएस अधिकारी म्हणाले, “सध्या तपासाचा मुख्य भर त्याच्या संपर्क जाळ्याचा शोध घेणे आणि कोणत्याही अतिरेकी संघटनेशी प्रत्यक्ष ऑपरेशनल लिंक किंवा भरतीचा प्रयत्न झाला का हे पडताळणे यावर आहे. आतापर्यंत कोणत्याही नियोजित हल्ल्याचे संकेत मिळालेले नाहीत, तरी आम्ही सर्व डिजिटल पुराव्याचे सखोल विश्लेषण करत आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

एटीएसकडून आरोपीच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी सुरू असून, त्यातून पुढील धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात ( ATS) आहे.

Follow Us On