Team My Pune City – राज्यातील लाखो भाविकांचे ( Ashtavinayaka ) श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र अष्टविनायक गणपती मंदिरांच्या विकासकामांना गती देताना मंदिरांच्या मूळ वास्तूला कोणताही धक्का लागू नये, तसेच प्रत्येक कामाला हेरिटेज स्वरूप लाभावे यासाठी काळजीपूर्वक नियोजन करण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
Alandi : आळंदीत सामाजिक, शैक्षणिक अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांचा गुणगौरव सोहळा
या संदर्भात मंदिर परिसर विकास आराखड्याचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात गुरुवारी ( दि.11) पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभाग( Ashtavinayaka ) पुणेचे सहायक संचालक विलाक वाहणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, अहिल्यानगर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गजानन पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले तसेच अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.
Accident : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात : चहा विक्रेत्या तरुणाचा जागीच मृत्यू
अष्टविनायकांपैकी मयूरेश्वर (मोरगाव), चिंतामणी (थेऊर), विघ्नेश्वर (ओझर), महागणपती (रांजणगाव), वरदविनायक (महड), सिद्धिविनायक (सिद्धटेक) आणि बल्लाळेश्वर (पाली) या मंदिरांच्या परिसरातील सुरू असणाऱ्या विकासकामांना वेळेत पूर्ण करावे, तसेच दर्जेदार कामगिरी करून भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना पवार यांनी( Ashtavinayaka ) दिल्या.
तसेच मंदिर परिसरात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने करून त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. मूळ मंदिराशी विसंगत असलेली बांधकामे दूर करून मोकळी जागा उपलब्ध करून द्यावी. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा अग्निशामक दलाची वाहने मंदिर परिसरात सहजतेने जाऊ शकतील, अशा दृष्टीने मार्गव्यवस्था सुसज्ज करण्यात यावी, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
यामुळे अष्टविनायक मंदिरांच्या पारंपरिक स्वरूपाचे जतन तर होईलच, पण भाविकांना आधुनिक सोयीसुविधांचा लाभही मिळणार ( Ashtavinayaka ) आहे.