Team MyPuneCity – काल दि.३० रोजी टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत सोलापूर जिल्ह्यात करण्यात ( Ashadhi Wari) आले.
विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे विठ्ठल नामाच्या अखंड गजरात सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. नातेपुते येथील रात्रीच्या मुक्कामा नंतर आज सकाळी पालखी सोहळा ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात , हरिनामाच्या गजरात ( Ashadhi Wari) माळशिरसकडे मार्गस्थ झाला आहे.
आज दुपारी पुरंदवडे येथे माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगणाचा सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो वारकरी भाविक आतुर आहेत.आज श्रींचा पालखी सोहळ्याचा मुक्काम माळशिरस येथे असणार ( Ashadhi Wari) आहे.