situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Arebian Mandi : हॉटेलात चिकनसोबत “फेदर स्पेशल”! – ग्राहकाच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाची नजर अरेबियन मंडी हॉटेलकडे

Published On:

Team MyPuneCity – हिंजवडीच्या मारुंजी रोडवरील अरेबियन मंडी (Arebian Mandi) हॉटेलवर अस्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कायदा आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीस प्रदीप नाईक यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे दिलेल्या लेखी तक्रारीत, हॉटेलमध्ये आढळलेल्या अस्वच्छतेबरोबरच प्लेटमध्ये सापडलेल्या कोंबडीच्या पिसावरून संताप व्यक्त केला आहे.

१६ जुलै रोजी रात्री ८.३० च्या सुमारास प्रदीप नाईक हे अरेबियन मंडी (Arebian Mandi) हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले असता, हॉटेलच्या बाहेरपासूनच भोंगळ कारभाराचा अनुभव यायला सुरूवात झाली. पार्किंगची व्यवस्था नसणे, जेवणाची जागा अस्वच्छ असणे, हात धुण्याची सोय उबगवाणी, आणि टेबल-खुर्च्यांवर तेलाचे डाग अशी चित्रं पाहायला मिळाली. त्यांनी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, वॉशरूमपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत सर्व काही दर्जाहीन व अस्वच्छ होतं.

Hinjawadi Traffic Jam : हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी परिसरातील रस्ते रुंदीकरणासाठी भूसंपादन

या अनुभवावर कळस चढवला तो त्यांच्या चिकनच्या प्लेटमधील अनोख्या घटकाने – निजाम चिकन कबाब खात असताना थाळीत चक्क कोंबडीचं पिस सापडलं. हा प्रकार पाहून नाईक यांनी तात्काळ मॅनेजरला बोलावून विचारणा केली. मॅनेजरने हॉटेल (Arebian Mandi) मालकाचे नाव सांगितले, पण वाद टाळण्यासाठी “काही बोलू नका, बिल सुद्धा देऊ नका” असा सल्ला दिला. मात्र, नाईक यांनी बिलाचे पैसे स्वतः दिले असून त्यांनी ४८२ रुपये भरल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रदीप नाईक यांनी या प्रकरणाबाबत तात्काळ कारवाईची मागणी केली असून, हॉटेलचा अन्न परवाना रद्द करण्यात यावा, अशी विनंती अन्न व औषध प्रशासन विभागाकडे केली आहे. त्यांनी या अस्वच्छतेमुळे आरोग्याला गंभीर धोका असल्याचे अधोरेखित करत अपायकारक अन्नामुळे रोगप्रसार होऊ शकतो आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ होण्याची भीतीही व्यक्त केली.

Maval Panchayat Samiti : मावळ पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गटांची फेररचना

या तक्रारीनंतर अरेबियन मंडी (Arebian Mandi) हॉटेलवर प्रशासनाची कारवाई होणार का, याकडे आता स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नावाखाली ‘फेदर स्पेशल’सारख्या अनुभवाने खवय्यांची पचनशक्तीच नव्हे तर सहनशक्तीही संपुष्टात येते, हे मात्र यातून स्पष्ट झाले आहे.

Follow Us On