Team My Pune City – सर्व वाचकांना दीपावली आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ( Annual Horoscope 2025) हे नववर्ष तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो-ही परमेश्वराजवळ प्रार्थना. विश्वाचा संदर्भ, दैवी शक्तीचे रहस्य आणि व्यवहारिक मार्गदर्शन- या सर्व घटकांना भव्य आणि आकर्षक शब्दांत गुंफून या वर्षाचे राशिभविष्य सादर केले आहे.
काळापर्यंत पसरलेल्या अथांग ब्रह्मांडात आपले अस्तित्व ( Annual Horoscope 2026) केवळ योग्यच नाही, तर अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्ती ही ग्रहांच्या महाकाळातील एक तेजस्वी, अर्थपूर्ण ओळ आहे.म्हणजेच, हीच ती दैवी शक्ती आहे जी मानवी भाषेत रूपांतरित होऊन ग्रहांच्या माध्यमातून व्यक्त होते -हीच ग्रहांची काव्यरचना!
ज्या क्षणी तुमचा जन्म झाला, त्या तेजस्वी क्षणी आकाशातील ग्रहांनी तुमच्या आत्म्यासाठी एक दैवी नियतीचा आराखडा – एक करार निश्चित केला. हा करार तुमच्या आयुष्यातील संघर्ष, सिद्धी, समाधान आणि कर्माच्या नियमांचे वर्णन करतो. ( Annual Horoscope 2026)
राशीभविष्य हे त्या दैवी कराराची भाषा समजून घेण्यास आणि विश्वाच्या चेतनेचा दिव्य आवाज ऐकण्यास
मदत करते. गुरूचा विस्तार, शनीची कठोर शिस्त, सूर्याचे तेजस्वी नेतृत्व आणि चंद्राची कोमल भावना-या सर्व ग्रहांच्या बदलांमुळे आपले भविष्य आकार घेत असते.राशीभविष्य नियतीच्या प्रवाहाविरुद्ध पोहायला शिकवत नाही;
तर ते तुमच्या अंतरात्म्याची शक्ती जागृत करते. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आपण आपल्या आयुष्याचे नाव यशाच्या णि आनंदाच्या किनाऱ्याकडे आत्मविश्वासाने नेऊ शकतो.
आपली आत्मशक्ती जागृत करून जीवन यशस्वी आणि आनंदमय बनवण्यासाठी आम्ही हे बारा राशींचे भविष्य लिहिले आहे. याचबरोबर आम्ही प्रत्येक राशीसाठी शुभवार, शुभरंग, शुभकारक रत्ने, तसेच या वर्षासाठी उपाय आणि उपासना दिली आहे. त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच होईल,
अशी खात्री आहे. एकदा पुन्हा, आपणास दीपावली आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ( Annual Horoscope 2026)

ज्योतिर्भास्कर उमेश स्वामी
ज्योतिष व वास्तु सल्लागार
केशवनगर, कासारवाडी, पुणे-४११०३४
मो .: 9922311104.
तूळ रास – नशिबाचे चक्र तुमच्या बाजूने फिरणार, यश आणि पैसा दोन्ही मिळणार ( Annual Horoscope 2026)
तूळ रास ही राशीचक्रातील सातवी रास असून, या राशीचा स्वामी शुक्र आहे. पुरुष स्वभावी, चरवृत्ती आणि
वायूतत्त्वाचीरासअसून, याराशीच चिन्ह समान दोन तराजू आहे.या राशीच्या व्यक्ती उत्साही असून रूप, सौंदर्य आणि रसिकता यांचा आस्वाद घेणारी असतात. वागण्यात एक वाक्यता असते. आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःचा तर्क वितर्क लावून न्यायाने काम पूर्ण करतात. नाटक, सिनेमा, रंगभूमी, नृत्य, काव्य हे तूळ राशीचे आवडते क्षेत्र आहेत.
व्यक्ती म्हणजे मानवी जीवनाचे वैभव, जीवन कसे जगावे हे तूळ राशीच्या व्यक्तीकडून शिकावे. सर्वांबरोबर मिळून मिसळून वागणारी मधुर व्यक्तिमत्व, . ( Annual Horoscope 2026) न्यायाबद्दल आवड आणि सर्वांबरोबर मिळते-जुळते घेण्याची वृत्ती असल्यामुळे प्रिय व्यक्ती ठरतात. निसर्गाचे खरे रसिक असतात. आपणास केवळ पैसा व संपत्ती हे
ध्येय नसते; निसर्ग, साहित्य, सौंदर्य आपण प्रसन्नतेने टिपता, तरल संवेदनाव मनस्वी स्वभाव तुम्हाला जन्मजात लाभलेला आहे.
समतोल वृत्तीबद्दल आपण प्रसिद्ध आहात. कोणत्याही घटनेत विचारात व प्रसंगात अटीतटीची भूमिका न घेणे, दुराग्रही वृत्ती न ठेवणे हा आपल्या स्वभावाचा मूळ भाग आहे. स्वातत्र्य, समानता, समता, न्याय व बंधुभाव ही तत्वें आपल्यात भिनलेली असतात. लोकशाही वृत्तीचे अनुकरण, आदर, दुसऱ्याबद्दल स्नेह आणि
प्रतिष्ठा सांभाळून ठेवणे यामुळे आपले सर्वत्र स्वागत होते.
नक्षत्रांनुसार स्वभाव :-. ( Annual Horoscope 2025)
तूळ राशीमध्ये चित्रा, स्वाती आणि विशाखा ही नक्षत्रे येतात.
चित्रा नक्षत्र: पराक्रमी, साहसी, बलवान, उत्साही, आर्थिक बाबतीत श्रेष्ठ, गणित विषय आवडता, पारख चांगली, गुढशास्त्राची आवड.
स्वाती नक्षत्रः शांत, व्यापारी वृत्तीची, कृपाळू, मधुर वचने, शांतताप्रिय, आनंदी, ईश्वरभक्त, संयमी, नीतिमान, सत्यप्रिय, आत्मसंयमी, विद्वान, चंचल आणि तडजोड करणारी व्यक्ती.. ( Annual Horoscope 2026)
विशाखा नक्षत्र: चिडखोर, रसिक, काही प्रमाणात उधळ्या, व्यवहाराची रुची, आकर्षक आणि प्रभावी व्यक्तिमत्व, काही वेळा असुरी वृत्ती, बोलण्यात अत्यंत चतुर. चालू वर्षाचे भविष्य राशीच्या भाग्य व दशम स्थानातून गुरुचे भ्रमण, षस्ठ स्थानातून शनी व नेफच्यूनचे भ्रमण, पंचम व लाभातून राहू केतूचे भ्रमण, तसेच अष्टम स्थानातून व चतुर्थातून हर्षल व प्लूटोचे भ्रमण याप्रमाणे यावर्षी आपलीप्रमुख ग्रह स्थिती आहे.
तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. उच्च शिक्षण व धार्मिक तीर्थयात्रा घडतील. मोठ्या धार्मिक स्थळांना भेटीगाठी द्याल. धर्मप्रचारक व्यक्तींना हा सुवर्णकाळ असेल. प्रवास सुखकारक राहील. हातून लिखाण होईल व त्यास प्रसिद्धी मिळेल; लेखकांसाठी हे वर्ष उत्तम राहील.
प्रेम: प्रेमिकांना “कभी खुशी कभी गम” असा अनुभव येईल. नोकरी/व्यवसाय: स्थिरता व मोठे यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी मानसन्मान वाढेल. कर्जमुक्ती किंवा कर्ज कमी होण्यासाठी हे वर्ष अनुकूल राहील, शत्रूवर विजय मिळेल.
जुन्या वस्तू, जुने ऐवज अशा गोष्टी जतन करण्याचा कल राहील. तूळ राशीच्या व्यक्तीसाठी विवाहासाठी हे वर्ष अनुकूल राहील. आरोग्य व आहार यात शिस्त ठेवावी लागेल. स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतील, गर्भवती स्रियांनी योग्य ती दक्षता ध्यावी, काही व्यक्तींना संततीकडून
नवीनगोष्टी शिकण्याची संधी मिळेल.
तुमची बुद्धिमत्ता वेगळया पद्धतीने काम करेल. आर्थिक लाभामध्य स्थिरता किवा तटस्थता जाणवेल. मोठे लाभ मिळवण्यापेक्षा आत्मिक समाधानावर भर दिल्यास उत्तम राहील. सामाजिक वर्तुळात सक्रिय राहाल, पण कोणतीही गोष्ट करताना इतर लोकांना सुद्धा सामावून घेत ल्यास ठीक राहील. भागीदारीतील व्यवसाय, कर्ज, गुंतवणूक यामध्ये मोठे आणि अचानक बदल होण्याची शक्यता आहे. वारसा हक्काच्या प्रोपर्टीमधील कामे नुकसानदायक अथवा दिरंगाई होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात संघर्ष अथवा गडबड/गोधळ दर्शवितो; त्याबाबत अत्यंत सावधगिरी बाळगा. एकंदरीत, तूळ राशीसाठी हे वर्ष करियर, नोकरी, धार्मिक प्रवास आणि सरकारी कामकाज असणाऱ्या व्यक्तींना अनुकूल राहील.
उपासना आणि उपाय . ( Annual Horoscope 2026)
*कुलदेवी उपासना, महालक्ष्मीची उपासना केल्यास उत्तम राहील.
*या वर्षासाठी मुळा, भाजी दान करणे; चांदीचा हत्ती ईशान्य
*कोपऱ्यात किंवा देवघरात ठेवणे; नदीमध्ये अथवा गरिबांना
*धान्य दान करणे; चामड्याच्या वस्तू, चप्पल, बेल्ट, पाकीट
गरजूंना दान करणे. उडीद, तेल, काळे वस्र मारुती मंदिरात दान
करून दिवा लावणे.
शुभ घटक
शुभ रंग: जांभळा, पांढरा, गुलाबी, निळा
भाग्यरत्न: पाचू, तुरमुली, ओपन डायमंड
शुभ दिनांक: कोणत्याही महिन्याचे ६, १५, २४. ( Annual Horoscope 2026)