Team My Pune City – सर्व वाचकांना दीपावली आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ( Annual Horoscope 2026)हे नववर्ष तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो-ही परमेश्वराजवळ प्रार्थना. विश्वाचा संदर्भ, दैवी शक्तीचे रहस्य आणि व्यवहारिक मार्गदर्शन- या सर्व घटकांना भव्य आणि आकर्षक शब्दांत गुंफून या वर्षाचे राशिभविष्य सादर केले आहे.
राशीभविष्य म्हणजे विश्वाच्या चेतनेचा दिव्य आवाज आणि अस्तित्वाचा महाग्रंथ. या क्षणापासून ते अनंत काळापर्यंत पसरलेल्या अथांग ब्रह्मांडात आपले अस्तित्व केवळ योग्यच नाही, तर अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्ती ही ग्रहांच्या महाकाळातील एक तेजस्वी, अर्थपूर्ण ओळ आहे.म्हणजेच, हीच ती दैवी शक्ती आहे जी मानवी भाषेत रूपांतरित होऊन ग्रहांच्या माध्यमातून व्यक्त होते -हीच ग्रहांची काव्यरचना!
ज्या क्षणी तुमचा जन्म झाला, त्या तेजस्वी क्षणी आकाशातील ग्रहांनी तुमच्या आत्म्यासाठी एक दैवी नियतीचा आराखडा – एक करार निश्चित केला. हा करार तुमच्या आयुष्यातील संघर्ष, सिद्धी, समाधान आणि कर्माच्या नियमांचे वर्णन करतो.
राशीभविष्य हे त्या दैवी कराराची भाषा समजून घेण्यास आणि विश्वाच्या चेतनेचा दिव्य आवाज ऐकण्यास
मदत करते. गुरूचा विस्तार, शनीची कठोर शिस्त, सूर्याचे तेजस्वी नेतृत्व आणि चंद्राची कोमल भावना-या सर्व ग्रहांच्या बदलांमुळे आपले भविष्य आकार घेत असते.राशीभविष्य नियतीच्या प्रवाहाविरुद्ध पोहायला शिकवत नाही;
तर ते तुमच्या अंतरात्म्याची शक्ती जागृत करते. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आपण आपल्या आयुष्याचे नाव यशाच्या णि आनंदाच्या किनाऱ्याकडे आत्मविश्वासाने नेऊ शकतो.
आपली आत्मशक्ती जागृत करून जीवन यशस्वी आणि आनंदमय बनवण्यासाठी आम्ही हे बारा राशींचे भविष्य लिहिले आहे. याचबरोबर आम्ही प्रत्येक राशीसाठी शुभवार, शुभरंग, शुभकारक रत्ने, तसेच या वर्षासाठी उपाय आणि उपासना दिली आहे. त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच होईल,
अशी खात्री आहे. एकदा पुन्हा, आपणास दीपावली आणि नववर्षाच्या ( Annual Horoscope 2026) हार्दिक शुभेच्छा!
 
ज्योतिर्भास्कर उमेश स्वामी
ज्योतिष व वास्तु सल्लागार
केशवनगर, कासारवाडी, पुणे-४११०३४
मो .: 9922311104
मेष रास
ध्येयपूर्तीचा आरंभ-ऊर्जा आणिनव्या दिशा
राशीचक्रातील मेष रास ही पहिली रास असून, साहसी, आत्मविश्वासू आणि पुरुषस्वभावी अशी ही रास रजोगुणांनी परिपूर्ण आहे. या राशीचे चिन्हमेंढा असून, ती अमी तत्त्वाची रास आहे. शूर आणि करारी व्यक्तिमत्त्व हे या राशीचे वैशिष्टय आहे. प्रत्येक क्षेत्रात तडफदार आणि आत्मविश्वासाने काम करण्याचा तुमचा स्वभाव आहे. काम करताना तुमचे उसळणारे तारुण्य आणि ओलांडून जाणारा उत्साह हे तुमच्या पराक्रमाचे मूळ आहेत.संकटकाळी न घाबरणारी, शेवटच्या क्षणापर्यंत उत्साह टिकवून ठेवणारी, आणि सदैव क्रियाशील राहणारी ही रास आहे. हे सर्वगुण प्रकाश आणि ऊर्जेच्या रूपाने मेष राशीत जाणवतात.
व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्ये :-
प्रचंड इच्छाशक्ती व स्वातंत्र्यप्रेम ही तुमची ओळख आहे. अशक्य” हा शब्द तुमच्या शब्दकोशात नसतो. तुमच्या व्यक्तिमत्वात अपूर्वताकद आहे. तुमचे मन व विचार नेहमी गतिमान असतात. वेग, तत्परता आणि क्रियाशीलता यामुळे नेतृत्वाचे कार्य आपोआप तुमच्याकडे येते. नमते घेणे किंवा माघार घेणे तुम्हाला सहसा जमत नाही. अपयश आलेच, तरी तुम्ही स्वस्त बसत नाही; परत जोमाने कामालालागता.
नक्षत्रांनुसार स्वभाव :-  ( Annual Horoscope 2026)
मेष राशीत अश्विनी, भरणी आणि कृत्तिका ही तीन नक्षत्रे येतात.
अश्विनी नक्षत्र:या नक्षत्रातील व्यक्तिमत्त्व विद्वान, चतुर, सौंदर्यप्रेमी, धाडसी व आत्मकांक्षी असते. अधिकारी पदाची लालसा असते. रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असते. सतत नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड असते. अशा व्यक्ती तेजस्वी संशोधक व
शास्रज्ञ असतात.
भरणी नक्षत्र: या नक्षत्रातील व्यक्ती वाचाळ, भाग्यवादी, भोजनप्रिय, दृढनिश्चयी आणि काही वेळा कठोर स्वभावाच्या असतात. सुगंधी वस्तूंचीआवड असते.
कृत्तिका नक्षत्र : या नक्षत्रातील व्यक्ती  तेजस्वी, विद्वान, चतुर आणि राजा समान वर्तन करणाऱ्या असतात. स्वाभिमानी, रुचकर गोष्टींत
रस घेणाऱ्या, परंतु काही वेळा क्रोधी स्वभावाच्या असतात.
चालू वर्षाचे भविष्य (२०२५) ( Annual Horoscope 2026)
या वर्षी गुरूचा गोचर तृतीय व चतुर्थ स्थानातून, शनीचा गोचर व्ययस्थानातून, राहू-केतूचा गोचर लाभ व पंचम स्थानातून, तसेच हर्षल, नेपच्यून आणि प्लुटोचा गोचर अनुक्रमे द्वितीय व दशम स्थानातून होत आहे. या ग्रहयोगांमुळे तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. नवीन गोष्टींसाठी तुम्ही धाडस कराल, आणि लहान प्रवास लाभदायक ठरतील. लेखन, कला आणि संगीत क्षेत्रात मनासारखे यश मिळेल.
सामाजिक कार्य करताना दक्षता आवश्यक आहे. भाऊ-बहिणींसाठी खर्च वाढू शकतो. सभा-संमेलनांत मानव प्रतिष्ठा मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. गृहसौख्य वाढेल. नवीन वाहन किंवा घर खरेदीचा योग आहे. कर्जाची कामे सहज पार पडतील. उत्पन्नात स्थिरता व वाढ होईल, परंतु अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. परदेशप्रवासाची शक्यता राहील. सहकाऱयांकडून मदत मिळेल. साडेसातीचा पहिला टप्पा
असल्याने काही नवीन जबाबदाऱ्या वाढतील. नोकरदारांना वरिष्ठांकडून मानसिक ताण जाणवू शकतो; त्यामुळे मानसिक समतोल राखावा. मित्र व सामाजिक वर्तुळातून लाभदायक घटना घडतील. प्रेमसंबंधात काही तटस्थता किंवा विरक्ती येऊ शकते.विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता राहील, संततीसंबंधी काळजी
घ्यावी, आर्थिक व बचत पद्धतीत मोठे बदल होतील.
*उत्पन्नाचे नवे स्रोत अचानक उपलब्ध होऊ शकतात.
*अध्यात्म व आत्मशोधाकडे आकर्षण वाढेल.
*गुप्त व तांत्रिक विषयांत रुची निर्माण होईल.
*सामाजिक प्रभाव वाढवण्यासाठी नियोजनपूर्वक खर्च करावा.
उपाय व उपासना :- ( Annual Horoscope 2026)
*गणपती आणि मारुती उपासना विशेष फलदायी ठरेल.
*गरजू व्यक्तींना चामड्याच्या वस्तूंचे दान करावे.
*”ॐशनेश्वराय नमः” यामंत्राचे जप करावा.
*शिवपूजा करावी.
*पिपळाच्या झाडाखालीदही-भात ठेवावा.
*दत्तमंदिरात अभिषेक करावा.
शुभ घटक ( Annual Horoscope 2026)
शुभ रंग: लालसर गुलाबी, पिवळा आणि नारंगी.
भाग्यरत्न: पिवळा पुष्कराज (विशेषतः अनुकूल).
तसेच ओपल किंवा स्फटिक या रत्नांचाही उपयोग शुभ.
*शुभ दिनांक :- ९,१८, २७
*शुभ वयोवर्ष :- १६, २२, २८, ३४, ४८, ५७, ६२.
तुमच्यातील जिद्द, आत्मविश्वास आणि पराक्रम याच वर्षी नव्या दिशा घेतील. ध्येयपूर्तीच्या या प्रवासाला शुभेच्छा!





















