Team My Pune City – सर्व वाचकांना दीपावली आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ( Annual Horoscope 2025) हे नववर्ष तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो-ही परमेश्वराजवळ प्रार्थना. विश्वाचा संदर्भ, दैवी शक्तीचे रहस्य आणि व्यवहारिक मार्गदर्शन- या सर्व घटकांना भव्य आणि आकर्षक शब्दांत गुंफून या वर्षाचे राशिभविष्य सादर केले आहे.
काळापर्यंत पसरलेल्या अथांग ब्रह्मांडात आपले अस्तित्व ( Annual Horoscope 2026) केवळ योग्यच नाही, तर अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्ती ही ग्रहांच्या महाकाळातील एक तेजस्वी, अर्थपूर्ण ओळ आहे.म्हणजेच, हीच ती दैवी शक्ती आहे जी मानवी भाषेत रूपांतरित होऊन ग्रहांच्या माध्यमातून व्यक्त होते -हीच ग्रहांची काव्यरचना!
ज्या क्षणी तुमचा जन्म झाला, त्या तेजस्वी क्षणी आकाशातील ग्रहांनी तुमच्या आत्म्यासाठी एक दैवी नियतीचा आराखडा – एक करार निश्चित केला. हा करार तुमच्या आयुष्यातील संघर्ष, सिद्धी, समाधान आणि कर्माच्या नियमांचे वर्णन करतो. ( Annual Horoscope 2026)
राशीभविष्य हे त्या दैवी कराराची भाषा समजून घेण्यास आणि विश्वाच्या चेतनेचा दिव्य आवाज ऐकण्यास
मदत करते. गुरूचा विस्तार, शनीची कठोर शिस्त, सूर्याचे तेजस्वी नेतृत्व आणि चंद्राची कोमल भावना-या सर्व ग्रहांच्या बदलांमुळे आपले भविष्य आकार घेत असते.राशीभविष्य नियतीच्या प्रवाहाविरुद्ध पोहायला शिकवत नाही;
तर ते तुमच्या अंतरात्म्याची शक्ती जागृत करते. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आपण आपल्या आयुष्याचे नाव यशाच्या णि आनंदाच्या किनाऱ्याकडे आत्मविश्वासाने नेऊ शकतो.
आपली आत्मशक्ती जागृत करून जीवन यशस्वी आणि आनंदमय बनवण्यासाठी आम्ही हे बारा राशींचे भविष्य लिहिले आहे. याचबरोबर आम्ही प्रत्येक राशीसाठी शुभवार, शुभरंग, शुभकारक रत्ने, तसेच या वर्षासाठी उपाय आणि उपासना दिली आहे. त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच होईल,
अशी खात्री आहे. एकदा पुन्हा, आपणास दीपावली आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ( Annual Horoscope 2026)

ज्योतिर्भास्कर उमेश स्वामी
ज्योतिष व वास्तु सल्लागार
केशवनगर, कासारवाडी, पुणे-४११०३४,
वृश्चिक रास -मोठे परिवर्तन, गुप्तशक्तीचा उदय ( Annual Horoscope 2025)
वृश्चिक रास ही राशीचक्रातील आठवी रास असून, विंचू हे या राशीचे प्रतीक आहे. ही महत्त्वाची आणि स्थिर रास असून बहुप्रसव रास आहे. या राशीचा स्वामी मंगळ आहे.
या राशीच्या व्यक्तीकडे असामान्य धैर्य, दृढ इच्छाशक्ती आणि विलक्षण मनोबल असते. काम पूर्ण करण्याची चिकाटी, सातत्य या गोष्टी आपल्याकडे असतात. आत्मसंयम, विवेक, निग्रह, निश्चयात्मकता, निर्धार या गोष्टी यशासाठी लागतात आणि त्या आपल्याकडे आहेत. अखंडपणे, अविरतपणे काम केल्यामुळे यश आपण मिळवता.
एखाद्या गोष्टीत मन लावून काम करणे, ध्येय लक्ष ठेवणे, अत्यंत उत्साही आणि आशावादी असणे, तडफदारीने काम करणे, न डगमगणे, हार न मानणे-अशा गुणांमुळे कार्यक्षेत्रावर आपली चमक लक्षात येते. ज्या ठिकाणी धाडसी आत्मविश्वासाची कामे असतात, त्या ठिकाणी आपण यशस्वी होता. कोणत्याही कामात यशाचे शिखर गाठणे किंवा एखाद्या क्षेत्रात उच्चांक प्रस्थापित करणे यामध्ये वृश्चिक राशीचे लोक अधिक आढळतात. ( Annual Horoscope 2025)
आपला आपल्या कार्यशक्तीवर, बुद्धिमत्तेवर आणि अंगभूत गुणांवर प्रचंड विश्वास असतो. स्पर्धा परीक्षेत वृश्चिक राशीचे व्यक्ती भरपूर आढळतात. तसेच, सैन्य, पोलीस दलात वृश्चिक राशीची व्यक्ती विशेष कामगिरी करतील. मोठ्या कामात ते पुढे येऊन जबाबदारी घेतात.
वृश्चिक राशीतील व्यक्तीचे परीक्षण करणे थोडे अवघड असते, कारण या राशीत अत्यंत टोकाच्या चांगल्या व अत्यंत टोकाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती आढळतात. कारण या राशीचा स्वामी मंगळ आहे, तो कशाप्रकारे व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत आहे, त्यानुसार ठरते. वृश्चिक रास म्हणजे चिकाटी, सातत्य.
नक्षत्रांनुसार स्वभाव :- ( Annual Horoscope 2026)
वृश्चिक राशीमध्ये विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा ही नक्षत्रे येतात.
विशाखा नक्षत्र: अल्पक्रोधी, लहान कारणांवरून रागीटपणा करणारे, प्रवासाची आवड असलेले, गुप्नकार्यात कुशल, हट्टीस्वभाव, वादविवादप्रिय.
अनुराधा नक्षत्रः सौंदर्याची आवड, कपडे, दागिने, प्रवास यांची लालसा, धनवान, संसारिक वृत्ती, गोड बोलणारे, दूरच्या प्रवासात आनंद अनुभवणारे.
ज्येष्ठा (अजिष्ठा) नक्षत्रः संतोषी, घातकी, आपमतलबी, शूर, धार्मिक, उपद्रवी, नेहमी संकटातून पळ काढणारी, उत्तम स्मरणशक्ती असणारी व्यक्ती.
चालू वर्षाचे भविष्य( Annual Horoscope 2026)
राशीच्या अष्टम व भाग्यातून गुरुचे भ्रमण, पंचम स्थानातून शनी व नेपच्यूनचे भ्रमण, चतुर्थ व दशमातून राहू-केतूचे भ्रमण, तसेच सप्तमात हर्षल व तृतीय स्थानातून प्लूटोचे भ्रमण अशी प्रमुख ग्रहस्थिती यावर्षी आपल्या राशीसाठी राहील.
यामुळे तुम्हाला वारसा हक्क व विम्याद्वारे धनलाभ होण्याची शक्यता आहे. वर्षाच्या पूर्वार्धात आरोग्याच्या तक्रारी वाढतील, अंगामध्ये आळस जाणवेल आणि दिनचर्या अनियमित राहील.
गुढविषयक कामामध्ये रुची वाढेल. एलआयसी एजंट,कमिशन एजंट या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना वर्षाचा पूर्वार्ध उत्तम राहील व तुमचे त्यावर वर्चस्व राहील. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यात नशिबाची साथ उत्तम राहील. वडिलांकडून किंवा गुरूंकडून मोलाचे मार्गदर्शन मिळेल.
प्रेम संबंधात स्थिरता येईल, मुलांच्या संबंध आणि जबाबदाऱ्या वाढतील. नवीन सर्जनशील प्रकल्प सुरू करण्यास हा कालखंड उत्तम राहील. शेअर्स बाजार किंवा सट्टा बाजार यामध्ये गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या.
तुमची बुद्धिमत्ता संशोधन कार्याकडे किंवा रीसर्च अँड डेव्हलपमेंटकडे कल दर्शवेल. नोकरीमध्ये बदल किंवा बदली दर्शविते. सरकारी संस्थेत काम करणाऱ्या व्यक्तींना किंवा क्षेत्रात असणाऱ्या सर्व दस्तावेज तपासूनच मते किंवा आदेश द्यावे.
वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या विक्षिप्त वागण्यामुळे स्वातंत्र्याची मागणी होऊ शकते. जून, जुलै, ऑगस्ट हे महिने कोर्ट-कचरी, जोडीदाराशी वादविवाद, प्रवास, व्यवसायिक भागीदारी यासारख्या घटनेबाबत काळजीपूर्वक दक्ष रहावे. कल्पनाशक्ती व आदर्शवाद वाढवून भावनिक गुंतवणूक महत्त्वाची ठरेल.
एकंदरीत, हे वर्ष कौटुंबिक व घरगुती जीवनात परिवर्तन, अनपेक्षित बदल आणि कामाचे स्वरूप बदलल्यामुळे स्मरणात राहील.
उपासना आणि उपाय ( Annual Horoscope 2026)
*शिवशंकराची उपासना केल्यास वर्ष उत्तम राहील.
*मंदिरात हिरवे मुग दान करणे, वाहत्या पाण्यात धने व बदाम
सोडणे, गंगास्नान करणे, गंगाजल देवघरात ठेवणे, दत्त मंदिरात
*केळी व मोसंबी फळे दान करणे.
शुभ घटक ( Annual Horoscope 2026)
शुभ रंग: गुलाबी, लालसर, मरून, ऑफ व्हाईट
भाग्यरत्न: पुष्कराज; तसेच ब्ल्यू टोपाझ किंवा ब्ल्यू जिरकॉन
वापरू शकता
शुभ दिनांक: कोणत्याही महिन्याचे १८,२१,२७
भाग्यकारक वयोवर्षे: २४, २५ ते ३३, ४१,५६.