अ. भा. मराठी प्रकाशक संघातर्फे अशोक मुळे यांना जीवनगौरव तर ल. म. कडू यांना साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार
Team My Pune City – प्रकाशकांसाठी कार्यरत असलेल्या अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे डिंपल प्रकाशनचे ( Announcement of Awards) अशोक मुळे (वसई) यांना जीवनगौरव तर बालसाहित्यकार, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ल. म. कडू (पुणे) यांना साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
प्रकाशक, ग्रंथवितरक किंवा साहित्याच्या प्रांतात असामान्य कामगिरी करणाऱ्या( Announcement of Awards) एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तीस जीवनगौरव पुरस्काराने तर मराठी साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनिय साहित्यनिर्मिती करणाऱ्या साहित्यिकास साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्काराने गौरविले जाते, अशी माहिती अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे आणि प्रमुख कार्यवाह पराग लोणकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
Self-immolation : ग्रामसभेत अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
पॉप्युलरचे रामदास भटकळ, नवसाहित्य बेळगावचे जवळकर बंधू, पॉप्युलर( Announcement of Awards) अमरावतीचे नंदकिशोर बजाज, बॉम्बे बुक डेपोचे पां. ना. कुमठा, परचुरे प्रकाशन मंदिराचे अप्पा परचुरे, राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर, ज्योती स्टोअर्स नाशिकचे वसंतराव खैरनार व शिरीष घाटपांडे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून 2025 सालच्या पुरस्कारासाठी अशोक मुळे यांची निवड करण्यात आली आहे. मुळे हे गेल्या 50 वर्षांपासून प्रकाशन व्यवसायात कार्यरत असून वाचन संस्कृती वाढविण्यासाठी, अभिरुचीसंपन्न समाजनिर्मितीसाठी कार्य करीत आहेत.
Pune: सिरत कमिटीच्या वतीने हजरत महंमद पैगंबर यांची १५०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी
द. मा. मिरासदार, निरंजन घाटे, प्रतिभा रानडे, प्रवीण दवणे, डॉ. तारा भवाळकर ( Announcement of Awards) यांना या पूर्वी साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात आले असून 2025 सालच्या पुरस्कारासाठी ल. म. कडू यांची निवड करण्यात आली आहे. ल. म. कडू यांच्या अनुभवसंपन्न साहित्याने मराठी साहित्याचे क्षितिज विस्तारले आहे. चौफेर व्यासंग, साक्षेपी चिंतन, साहित्य निर्मितीसाठी घेतलेले अफाट कष्ट याद्वारे अंकुरलेल्या ज्ञानसाधनेतून केलेल्या कसदार लेखनाबद्दल ल. म. कडू यांचा साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्काराने गौरव केला जाणार आहे.