situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Anna Bodade:योग म्हणजे भारताने जगाला दिलेला आरोग्याचा उत्तम अर्क – उप आयुक्त अण्णा बोदडे

Published On:
---Advertisement---

जागतिक योग दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका व मनुश्री योग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पृथ्वी एक आरोग्य’ या संकल्पनेवर वृक्ष लागवड करत योग साधना

Team MyPuneCity –जागतिक योग दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका व मनुश्री योग यांच्या संयुक्त विद्यमाने रहाटणी येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे योग साधना करण्यात आली. यंदाच्या केंद्र सरकारच्या ‘एक पृथ्वी एक आरोग्य’ या संकल्पनेवर आधारित योग साधना करतांना उप आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून योग सत्राला सुरवात करण्यात आली.

यावेळी माजी नगर सदस्य गोपाल मळेकर, उद्यान अधिक्षक महेश गारगोटे, मनुश्री योगच्या योगाचार्य नूतन जोंधळे, मच्छिंद्र रोडे, कृष्णा आंधळे, मंगेश जोंधळे, डॉ. अशोक ठाकरे, मिया बाय तनिष्क च्या व्यवस्थापक रचना वर्मा, उद्यान सहाय्यक हनुमंत चाकणकर तसेच मनुश्री योग परिवार, धर्मवीर गार्डन ग्रुप व नागरिक उपस्थित होते.

Talegaon Dabhade : रूडसेट संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभाग, क्रीडा व सांस्कृतिक विभाग, उद्यान व वृक्ष संवर्धन विभाग आणि रहाटणी येथील मनुश्री योग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनानिमित्त योग सत्रास उपस्थित नागरिकांना ‘एक पृथ्वी एक आरोग्य’ या संकल्पनेवर आधारित योग शिकवण्यात आले. यामध्ये २ वर्षाच्या बालकापासून ८० वर्षांच्या आजोबापर्यंत चे नागरिक सहभागी झाले होते. योगाचार्य नूतन जोंधळे व मच्छिंद्र रोडे यांनी प्रत्येकाला करता येथील असे साधे आणि सोपे योग प्रकार शिकवले. यामध्ये ताडासन, कपालभाती, निद्रासन, यासारख्या सोप्या योगांचा देखील समावेश होता. तर डॉ. अशोक पवार यांनी उपस्थिताना हसण्याचे विविध प्रकार शिकवले. अत्यंत प्रेरणादायी व उत्साही वातावरणात योग कार्यक्रम संपन्न झाला.

आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या पालखी सोहळ्याच्या वातावरणात जागतिक योग दिनानिमित्त आजच्या योग सत्रात प्रत्येक सहभागी नागरिकांना उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाच्या वृक्षारोपण मोहिमेच्या माध्यमातून सर्वाधिक ऑक्सिजन देणारे तुलसीचे रोपटे भेट म्हणून देण्यात आले. तसेच योग दिनानिमित्त मिया बाय तनिष्क च्या वतीने सर्वांना पौष्ठिक आहार व प्रमाण पत्र देनात आले.

यावेळी उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाच्या पिंपरी चिंचवड शहरातील दीड लाख झाडांच्या वृक्षारोपण मोहिमेंतर्गत या योग कार्यक्रमानिमित्त छत्रपती संभाजी महाराज उद्यानामध्ये उप आयुक्त अण्णा बोदडे व सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे यांच्या हस्ते विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

आपल्या जीवनाचा खरा आधार आरोग्य आहे. आरोग्यचा खरा आधार म्हणजे निसर्ग म्हणूनच आज जागतिक योग दिनाच्या निमित्त आपण वृक्ष लागवड करतोय आणि समोर योग कार्यक्रमात २ वर्षाचा ध्रुव पाटील हा बालक योग करतोय. ‘पेरतो तेच उगते हेच उगते’ ही सांगणारी हीच आपली भारतीय संस्कृती आहे.
-अण्णा बोदडे, उप आयुक्त , माहिती व जनसंपर्क विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

योग साधना ही प्राचीन भारतीय कला आहे. रोजच्या जीवनात रोज सकाळी १ तास आपण योग साधना रोज केल्याने आरोग्य सुदृढ राहील. आपल्या परीसारतील महापालिकेच्या उद्यानामध्ये रोज जाऊन निसर्गाच्या सानिध्यात योग करून आरोग्य संपन्न शरीर कमवा.
-उमेश ढाकणे , सहाय्यक आयुक्त, उद्यान व वृक्ष संवर्धन विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Follow Us On