Team My pune city – विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्यातील जनविरोधी तरतुदींविरोधात काल ( गुरुवारी ७ ऑगस्ट रोजी ) महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याने बनसोडे यांनी, “हे निवेदन आता थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचवू,” असा इशारा यावेळी दिला.
यावेळी या आंदोलनात पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष योगेश बहल , महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट माजी आमदार विलास लांडे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक अजित गव्हाणे, माजी उपमहापौर (Anna Bansode) डब्बू आसवाणी, वैशाली घोडेकर, फजल शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Rashi Bhavishya 8 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
महापालिकेच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्या मुळे राहत्या घरांवर चुकीची आरक्षणे लादली गेली असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याने अण्णा बनसोडे आपल्या सहकाऱ्यांसमवेत नागरिकांच्या वतीने महापालिकेला निवेदन देण्यासाठी महापालिकेत गेले होते. यावेळी तेथे आयुक्त शेखर सिंह किंवा अतिरिक्त आयुक्त कोणीही उपस्थित नव्हते. तसेच इतर अधिकाऱ्यांनीही निवेदन स्वीकारण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे अण्णा बनसोडेंनी हे निवेदन आता थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचवू,” असा इशारा यावेळी दिला व तीव्र नाराजी (Anna Bansode) व्यक्त केली.