Team My Pune City – सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात ( Anjana Krishna ) बेकायदेशीर वाळू उत्खननाविरोधात कायद्याची अंमलबजावणी करताना दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल व कर्तव्यनिष्ठेबद्दल आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांचे पिंपरी-चिंचवड आपच्या वतीने कौतुक करत त्यांच्या कारवाईला पाठिंबा देण्यात आला. सार्वजनिक संसाधनांचे प्रचंड नुकसान करणाऱ्या या अवैध प्रथेविरोधात स्थानिक नागरिकांच्या तक्रारींवर आधारित कठोर पावले उचलून त्यांनी खरी जबाबदारी पार पाडली असल्याचे आपचे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी सांगितले.
Ganeshotsav : इच्छुक भावी नगरसेवकांची गणेशोत्सवात भाऊगर्दी
रविराज काळे म्हणाले, या कायदेशीर कारवाईच्या बदल्यात त्यांना( Anjana Krishna ) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून धमक्यांना सामोरे जावे लागल्याची घटना अत्यंत धक्कादायक आणि निंदनीय आहे. एका फोन कॉलवर थेट हस्तक्षेप करून अजित पवार यांनी तातडीने कारवाई थांबवण्याचे आदेश दिले व कायद्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे करणाऱ्या अधिकारी अंजना कृष्णा यांना फटकारले.
Rashi Bhavishya 8 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
हा प्रकार प्रशासकीय स्वायत्ततेवर थेट गदा आणणारा असून, लोकशाहीच्या तत्त्वांना धक्का देणारा आहे. सरकारी अधिकारी कायदा आणि जनहितासाठी कार्य करत असताना त्यांच्यावर दबाव आणणे, धमक्या देणे हे लोकशाही व्यवस्थेस अजिबात सुसंगत नाही. आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड तर्फे आम्ही अधिकारी अंजना कृष्णा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि त्यांना संपूर्ण पाठिंबा जाहीर करतो. पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी ( Anjana Krishna ) जाहीर केले.