Team My Pune City -ज्येष्ठ उद्योजक, मॉडर्न ऑप्टिशियनचे संचालक, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अनिल गोविंद गानू (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (२३ ऑगस्ट २०२५ ) निधन झाले तर रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सोमवार (२५ ऑगस्ट) रोजी सायं. ६ वाजता भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सभागृहात (भरत नाट्य मंदिराजवळ, सदाशिव पेठ) श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र चित्पावन संघ आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे ते माजी पदाधिकारी होते. ब्राह्मण जागृती सेवा संघ, आम्ही सारे ब्राह्मण, वेदशास्त्रोतेजक सभा, हर घर सावरकर, श्री सद्गुरु ग्रुप, जनलक्ष्मी बँक, लोकमान्य टिळक प्रतिष्ठान, असीम फाउंडेशन, परशुराम ढोल ताशा पथक अशा अनेक संस्थांचे व विविध ब्राह्मण संस्थांचे ते आधारस्तंभ होते.
Pune: लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्या सदस्यांनी घेतली माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांची भेट
Talegaon Dabhade: वृक्षारोपण काळाची गरज- सुरेश धोत्रे
कोकणात दापोलीजवळ बुरोंडी येथे त्यांनी भगवान परशुरामाचा भव्य पुतळा स्थापन करून परशुरामाचा सत्य इतिहास जनतेसमोर यावा यासाठी अहर्निश प्रयत्न केले. अनेक संस्थांना त्यांनी परशुरामाच्या सुबक मूर्ती प्रेरणा म्हणून भेट दिल्या. सामाजिक कार्यात ते अखेरपर्यंत सक्रीय होते. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत थोरले बाजीराव पेशवे पुतळा उभारण्यात त्यांचा देखील मोलाचा वाटा होता.