Team My pune city – महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री, देवेंद्रजी फडणवीस (Amit Gorkhe)यांच्या वाढदिवसाचे शुभ औचित्य साधून आणि कै. गणपतराव गोरखे यांच्या पवित्र स्मृतिदिनानिमित्त, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आमदार अमित गोरखे आणि सन्माननीय नगरसेविका, श्रीमती अनुराधा गणपतराव गोरखे यांच्या संयुक्त विद्यमाने या समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
DJ-free procession: गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवासाठी पोलिसांची बैठक पार पडली; डीजे मुक्त मिरवणुकीला मंडळांचा सकारात्मक प्रतिसाद
Alandi: हरिनाम गजरात माऊलींची नगरप्रदक्षिणा
हे रक्तदान शिबिर उद्या, २२ जुलै २०२५ रोजी, सकाळी १०:०० वाजल्यापासून ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत पिंपरी येथील श्री सिद्धिविनायक मंदिर परिसर, संभाजीनगर कर्तव्यपथ जनसंपर्क कार्यालयासमोर आयोजित करण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्व नागरिकांना या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आमदार अमित गोरखे यांनी केले आहे.