situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PMPML Fare Hike : पीएमपीएमएल भाडेवाढीला सर्वपक्षीय विरोध, सत्ताधाऱ्यांचा बचावात्मक पवित्रा व विरोधक आक्रमक

Updated On:
PMPML Fare Hike

Team MyPuneCity – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील लाखो प्रवाशांना धक्का देणारी पीएमपीएमएलच्या भाडेवाढीची (PMPML Fare Hike) घोषणा आता मोठ्या वादात अडकली आहे. १ जूनपासून लागू झालेल्या या दरवाढीविरोधात सर्वच राजकीय पक्षांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, विरोधक आक्रमक होत आंदोलनाची तयारी दर्शवत आहेत. तर सत्ताधाऱ्यांनी ‘प्रशासनाशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ’ असा बचावात्मक पवित्रा घेतला आहे.

पीएमपीएमएलने १ जून २०२५ पासून प्रवास दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ (PMPML Fare Hike) केली आहे. १ ते ५ किमी अंतरासाठी १० रुपये, दैनंदिन पाससाठी ७० रुपये (पूर्वी ४० रुपये), पीएमआरडीए हद्दीत १५० रुपये (पूर्वी १२० रुपये), तर मासिक पाससाठी तब्बल १५०० रुपये (पूर्वी ९०० रुपये) आकारले जात आहेत. ही दरवाढ मागील ११ वर्षांतील सर्वात मोठी असून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे.

🔻 विरोधकांची आक्रमक भूमिका

🗣️ प्रशांत जगताप (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट)

“पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका पीएमपीएमएलला कोट्यवधींचा निधी देतात. तरीही दरवाढीचा (PMPML Fare Hike) निर्णय घेतल्याने हा निधी नेमका कुठे जातो, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणातील दरवाढ पुणेकरांच्या खिशावर गदा आणणारी आहे. आम्ही या निर्णयाचा तीव्र निषेध करतो. प्रशासनाने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू.”

Special Editorial : पीएमपीएमएलची अन्याय्य दरवाढ – सामान्य प्रवाशांच्या खिशावर दरोडा!

🗣️ अरविंद शिंदे (अध्यक्ष, पुणे शहर काँग्रेस पक्ष)

“भाजपने निवडणुकीपूर्वी मेट्रोचा गाजावाजा केला. पण आज मेट्रोचा गतीमान प्रगतीत प्रकल्प ठरतो आहे. दुसरीकडे, पीएमपीएमएल दरवाढीमुळे नागरिक त्रस्त आहेत. ही दरवाढ ठेकेदारांच्या हितासाठी आहे, सामान्य जनतेसाठी नव्हे. आम्ही या अन्यायकारक निर्णयाचा विरोध करतो आणि तात्काळ दरवाढ मागे घेण्याची मागणी करतो.”

🗣️ संजय मोरे (पुणे शहरप्रमुख, शिवसेना – ठाकरे गट)

“पुढील चार महिन्यांत महापालिका निवडणुका येणार आहेत. त्याआधी भाजपकडून दरवाढ (PMPML Fare Hike) करून नंतर ती अर्धवट कमी करून जनतेला फसवण्याचा डाव खेळला जाईल. पुणेकर नागरिक आता या फसवणुकीला बळी पडणार नाहीत. आम्ही या दरवाढीविरोधात तीव्र आंदोलन करणार असून, प्रशासनावर दबाव टाकू.”

PMPML Fare Hike : दरनिश्चितीसाठी एकच सूत्र लागू करा; पाच रुपयांचे किमान तिकीट पुन्हा सुरू करावे

🗣️ नाना भानगिरे (पुणे शहरप्रमुख, शिवसेना – शिंदे गट)

“पीएमपीएमएलने नागरिकांच्या गरजा लक्षात न घेता ठेकेदारांच्या फायद्यासाठी ही दरवाढ केली आहे. ही दरवाढ पूर्णपणे अन्यायकारक आहे. आम्ही या निर्णयाचा विरोध करतो. प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला नाही, तर आम्ही आंदोलन छेडू.”

🔹 सत्ताधाऱ्यांचा बचावात्मक पवित्रा

🗣️ धीरज घाटे (अध्यक्ष, भाजप पुणे शहर)

“दरवाढीच्या निर्णयावर (PMPML Fare Hike) आमचाही अभ्यास सुरू आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची आम्ही काळजी घेणार आहोत. पीएमपीएमएल आणि मेट्रोच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक स्वीकारावी, हा आमचा हेतू आहे. दरवाढीच्या पार्श्वभूमीवर लवकरच प्रशासनाशी बैठक घेऊन पुणेकरांना दिलासा देणारा निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न असेल.”

Solapur Crime News: वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर सोलापुरातही सासरच्या छळाला कंटाळून गर्भवती महिलेनं गळ्याला लावला दोर

पीएमपीएमएल दरवाढीचा मुद्दा आता पूर्णतः राजकीय रंग घेत असून सर्वच पक्षांनी आपापली भूमिका ठामपणे मांडली आहे. विरोधकांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर ताण वाढण्याची शक्यता आहे. यापुढे नागरिकांच्या दबावाखाली प्रशासन दरवाढ मागे घेते की सवलतीसह नवा मार्ग काढते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us On