Team MyPuneCity -संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी (Alandi) रथ बैलांचे आज पूजन व मिरवणूक याचे आयोजन करण्यात आले होते. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ बैलांचे पूजन निमित्त राज्यमंत्री माधुरी ताई मिसाळ यांचे आळंदीत आगमन झाले होते.
यावेळी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे त्यांनी दर्शन घेतले. देवस्थानच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन मंदिर महाद्वार येथे त्यांच्या हस्ते श्रींच्या रथाच्या बैलजोडीचे पूजन करण्यात आले.यावेळी माधुरी ताई मिसाळ म्हणाल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यास लवकरच सुरुवात होणार आहे.
Yashwant Mohol : काँग्रेस तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा
त्यानिमित्ताने श्रींच्या रथाच्या बैलजोडी पूजनाचा सोहळा आज श्रीक्षेत्र आळंदी येथे पार पडला. अर्जुन मारुती घुंडरे व विवेक ज्ञानेश्वर घुंडरे बैलजोडीचे मानकरी आहेत. श्रींच्या पालखीचे रथ ओढणाऱ्या बैलजोडीचे पूजन करण्याचा मान मला दिल्याबद्दल मी मनःपूर्वक आभारी (Alandi) आहे.
या सोहळ्यास श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती आळंदीचे विश्वस्त योगी निरंजनाथ ,भावार्थ रामचंद्र देखणे, राजेंद्र बाबुराव उमाप, चैतन्य केशवराव लोंढे, रोहिणी पवार, पुरुषोत्तम मुरलीधर पाटील, तसेच पंढरपूर मंदिर समितीच्या माधवी निगडे, आणि मुख्याधिकारी माधव खांडेकर ( Alandi) उपस्थित होते.