Team My Pune City – आळंदी येथील ज्ञानेश्वरी मंदिर घाट परिसर (Alandi)येथून एक महिला इंद्रायणी नदीपात्रा मध्ये पडून अडकल्याची घटना घडली होती.ती घटना घडताच तत्काळ पालिकेस कळवण्यात आले होते.
पालिका कर्मचारी व स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिला वाचवण्यास यश मिळाले.नदी पात्रातून बाहेर काढताच रुग्णवाहीकेतून तिला पुढील उपचारासाठी आळंदी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
सदर महिलेचे नाव जयश्री कैलास काळे(रा.चाकण चौक) असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
Pimpri: सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने सनदी लेखापाल परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी सन्मानित
Sangeeta Bijlani: अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या फार्महाऊसमध्ये चोरी
सदर महिलेस प्राथमिक उपचार देत ग्रामीण रुग्णालयात ऍडमिट केले आहे.महिलेची प्रकृती स्थिर,व्यवस्थित आहे.सदर घटनेची माहिती मिळताच तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये धाव घेतली आहे.याबाबत माहिती ग्रामीण रुग्णालय अधीक्षक उर्मिला शिंदे यांनी दिली.