प्रदक्षिणा मार्ग पुंडलिक मंदिराजवळ खडतर
Team MyPuneCity – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान (Alandi) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे.परंतु इंद्रायणी घाटा वरील दर्शनबारी सुविधेसाठी असलेला स्कायवॉकला जोड देत लोखंडी स्वरूपात फॅब्रिकेटेड पुलाचे काम सुरू आहे. तो स्कायवॉक अद्याप देऊळवाड्याला जोडला गेला नाही. स्कायवॉक पुलाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून त्यास कोट्यावधी रुपये खर्च केला आहे. स्कायवॉक पूल हा यंदा दर्शनबारी सुविधेसाठी उपयोगात आणला जात आहे, मात्र हा पूल पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी पूर्ण होईल की नाही याबाबत शंका आहे.
Crime News : पत्नीवर अत्याचार करण्यास मित्रांनाच पाडले भाग ; आरोपी पतीसह तिघांना यवत पोलिसांकडून अटक
वारकरी भाविकांना सद्यस्थितीत भक्त पुंडलिक मंदिरासमोरील परिसरातून येताना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. एकादशी पालखी नगर प्रदक्षिणेवेळी या भागातून पालखी जास्त असते. घाटावरील ते काम पाहता एकादशी पालखी नगर प्रदक्षिणेवेळी त्या कामाचा अडसर वारकरी भाविकांना निर्माण होणार आहे. तसेच दि.१९ जून रोजी पालखी प्रस्थान (Alandi) सोहळा आहे.
Crime News : पत्नीवर अत्याचार करण्यास मित्रांनाच पाडले भाग ; आरोपी पतीसह तिघांना यवत पोलिसांकडून अटक
दोन ते तीन दिवस अगोदरच भाविक आळंदीत येत असतात.आलेली वारकऱ्यांची दिंडी पालिका चौकातून नदी घाटावर तेथून जात असते. ठीकठिकाणी कामानिमित्त केलेले खड्डे व त्यातून निघालेल्या काही मातीचा राडा रोडा घाटावरच पडून आहे. तसेच मातीचा चिखल झाल्याने तेथून रहदारी करणाऱ्या नागरिकांना त्याचा अडसर होत (Alandi) आहे.

स्कायवॉक चे काम करताना पायऱ्या नदी पात्रात उतरवल्याने ते काम फसले गेले असे प्रशासन बैठकीत मुद्दा मांडला गेला. जिल्हाअधिकारी दौऱ्यावेळी भक्ती सोपान पूल दर्शनबारीसाठी सुरक्षित नसल्याचे आढळले. तो पूल बंद करावा. नव्याने तात्पुरती सोय म्हणून पूल बांधण्याचे आदेश दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आणि भक्त पुंडलिक मंदिरासमोरील नंदीलगतच लोखंडी फॅब्रिकेटेड पुलाचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी नदीघाटावर खोद काम सुरू आहे. याबाबत अर्जुन मेदनकर म्हणाले पुन्हा पायऱ्या उतरविण्याचे नियोजन फसले. नियोजनबद्ध काम (Alandi) सुरू नाही.