Team MyPuneCity – राज्यात ठिकठिकाणी गेले दोन तीन दिवस मुसळधार पाऊस होत आहे. मावळ व धरणक्षेत्र परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत काल सायंकाळनंतर वाढ झालेली दिसून (Alandi) आली.

Alandi :आळंदीत शिवसेना युवासेना वृत्तपत्र वाचनालयाचे उद्घाटन
नदीपात्रामधील भक्त पुंडलिक मंदिराजवळील नदीपर्यंत पाणी आले आहे. तसेच भागीरथी त्रिवेणी कुंड पाण्याखाली आहे. आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. इंद्रायणी नदीजवळ असलेले चाकण रोड येथील वाहनतळ वाहनांनी (Alandi) भरलेले होते.
इंद्रायणी नदीकाठी काही भाविक स्नानासाठी येत होते. तर महिला भाविक माता भगिनी पवित्र इंद्रायणी मातेची आरती,पूजा करत होत्या. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त देवस्थान, नगरपालिकेची नियोजनासंदर्भात लगबग सुरु (Alandi) आहे.