Team MyPuneCity – राज्यात ठीक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मावळ व धरण क्षेत्र परिसरातही गेल्या काही दिवसांपासून पाऊस जोरदार सुरू आहे. यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. आळंदी येथील भक्ती सोपान पुल पाण्याखाली गेला आहे.भक्त पुंडलिक मंदिराभोवती तसेच तेथील दगडी घाटावर पाणी आले आहे.त्रिवेणी भागीरथी कुंड पाण्याखाली असून त्याच्या वरील दगडी घाटावर नदीपात्राचे पाणी आले आहे.सिद्धबेट येथील जुन्या बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे. तसेच नरसिंह स्वामी मठ जवळील बंधाऱ्यावरून काहीशा प्रमाणात पाणी वाहू लागले (Alandi) होते.
Palkhi Sohala : माऊलींची पालखी दिवेघाट पार करत असताना बैल उधळला
काल दि.२३ रोजी संध्याकाळी वडिवळे धरणाच्या सांडव्यातून कुंडली नदी पात्रामधील विसर्ग वाढवून २१०३ क्यूसेक्स करण्यात आला होता. पाऊस वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास (Alandi) परिस्थितीनुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येईल. पुणे पाटबंधारे विभागाच्यावतीने आवाहन करण्यात आले होते.
Maval : पंधरा वर्षांनंतर पुन्हा भरली शाळा; जुन्या आठवणींना उजाळा!
नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात येत आहे. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता (Alandi) घ्यावी.