Team My pune city – राज्यात गेल्या दोन चार दिवसांपासून( Alandi) ठिक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच मावळ व धरण क्षेत्र परिसरात ही संततधार पाऊस सुरू आहे.यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.भक्ती सोपान पूल पाण्याखाली आहे.तसेच आळंदी येथील इंद्रायणी नदीचे दोन्ही दगडी घाट पाण्याखाली गेले आहे.
सिद्धबेटातील काही परिसरात पाणी आले आहे.पोलीस प्रशासन ( Alandi) नदी घाटावर तैनात आहे.काल पासून पालिका कर्मचारी पाण्याच्या पातळी संबधीत माहिती पालिका प्रशासनास व शहरातील नागरिकांना कळवत आहेत.

Uddhav Shri Award : विजय जगताप यांना कार्याबद्दल “उद्धव श्री” पुरस्कार प्रदान
शनी मंदिर परिसरातील दुकानदार यांना रात्री सुचना देऊन ( Alandi) साहित्य बाहेर काढण्यास पालिकेच्या वतीने सुचना केल्या आहेत.काल रात्री पालिका कर्मचाऱ्यांनी नदी घाटावर बेवारस लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.नदी घाटावर लोक राहू नये यासाठी पहाटे पर्यंत पालिका कर्मचारी व पोलीस प्रशासन कार्यरत होते.
School Holiday : अतिवृष्टीमुळे मावळातील सर्व शाळा आज बंद, सुट्टी भरून काढण्यासाठी रविवारी शाळा
इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे त्यामुळे भक्ती सोपान पूल पाण्याखाली गेला आहे, नागरिकांनी पुलाचा वापर करू नये तसेच घाटावरही ( Alandi) पाणी वाहत आहे, नागरिकांनी नदीच्या पाण्यात उतरू नये तसेच इंद्रायणी नदीच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे व प्रशासनाला सहकार्य करावे. आवाहन आळंदी नगरपरिषदेच्या वतीने देण्यात आला आहे.तसेच आपत्तीजनक परिस्थितीत मनिष गायकवाड.
अभियंता +917843081116, प्रसाद बोराटे,918007720072 या क्रमांकाशी संपर्क साधावा.