Team MyPuneCity -महाराष्ट्रात अवकाळी पावसाने ठिक ठिकाणी जोरदार हजेरी लावलेली आहे.गेली सात आठ दिवस मावळ तसेच धरण क्षेत्र परिसरात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला असून इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.काल दि.20 रोजी रात्री आठ वाजता आळंदी शहरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.शहरातील वडगांव चौक,मरकळ चौक,नगरपालिका चौक ,चाकण चौक ,देहूफाटा चौक इ. अश्या विविध रस्त्यांवरून पावसाचे पाणी वाहत होते.
जोरदार अवकाळी पाऊस पडून ही इंद्रायणी प्रदूषणाने फेसाळलेलीच
गेली सात आठ दिवस अवकाळी पाऊस ठीक ठिकाणी जोरदार पडत आहे.मावळ व धरणक्षेत्रात अवकाळी पाऊस जोरदार झाला असून इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असली तरीइंद्रायणी नदी प्रदूषणाने मोठ्या प्रमाणात फेसाळलेली
दिसून येत आहे. इंद्रायणी नदी काठच्या गावातील मैलामिश्रित सांडपाणी तसेच कारखान्यातील रासायनिक युक्त सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट ते सांडपाणी इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते. यामुळे इंद्रायणी नदी वारंवार जल प्रदूषणाने फेसाळलेली दिसून येत आहे.
Pune Rain : पुणे आणि लोणावळ्यात मुसळधार सरी, चिंचवडमध्ये सर्वाधिक १०१ मिमी पावसाची नोंद


इंद्रायणी नदी रासायनाने पूर्णतः फेसाळलेली दिसत आहे.सर्वांनी इंद्रायणी माता स्वच्छतेसाठी व ती स्वच्छ होऊन तिचे तीर्थ आपल्या हातावर घेता यावे यासाठी प्रयत्न करावेत.तसेच प्रदूषण रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. असे मत आळंदीतील नागरिकाने मांडले.
इंद्रायणी नदीला रासायनिकयुक्त पाणी प्रदूषित करत आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यावर काय कार्य करत आहे?जलचर जीव संपुष्टात येत आहेत.इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी सर्वांनी एकत्र यावे.असे यावेळी इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने विठ्ठल शिंदे म्हणाले.अवकाळी जोरदार पाऊस झाल्याने सिध्दबेट बंधाऱ्या मधील नदीपत्रात जलपर्णी वाहून आल्याचे दिसून येत आहे.