Team My pune city – आळंदी येथील ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाजी विक्रेते, फळ विक्रेते इ. मुळे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तेथील रस्त्यावर विक्रेते दुतर्फा बसत असल्याने रस्ता अरुंद पडून रुग्णवाहिकेस ग्रामीण रुग्णालयात ये जा करण्यास ( Alandi ) अडथळा निर्माण होत आहे.
PMRDA : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता खुला करण्यास पीएमआरडीएकडून प्रारंभ
ग्रामीण रुग्णालयास पहिले दोन लोखंडी गेट होते.भाजी बाजार जवळील गेट बंद करत तिथे सुरक्षा भिंत उभारलेली दिसून येत आहे.तेथील पूर्वीच्या गेट पर्यंत भाजी विक्रेते व इतर विक्रेते बसत होते.तसेच पालिकेने पोलीस चौकी जवळील रस्ता ते सद्यस्थितीत बंद करण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय लोखंडी गेट (भाजी बाजार जवळील)पर्यंत भाजी विक्रेते व इतर विक्रेते यांना बसण्यासाठी ( Alandi ) बंदी घातली होती.
Mishap : जुना मुंबई-पुणे महामार्गावर कार जळून खाक; सुदैवाने कोणीही जखमी नाही
जे त्या परिसरात बसेल त्यावर कारवाई चे आदेश २०२३ तत्कालीन तहसीलदार, तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या प्रशासकीय बैठकीत झाले होते. मात्र वारंवार अतिक्रमण विभागाचे त्याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.
सद्यस्थितीत ग्रामीण रुग्णालय कडे जाणाऱ्या मार्गावर व मेन गेट पर्यंत भाजी विक्रेते बसलेले दिसून येत आहेत.दुसरे गेट बंद करून सुद्धा पोलीस स्टेशन जवळील रस्ता ते मेन गेट पर्यंत भाजी विक्रेते व इतर विक्रेते बसल्याने तिथे गर्दी निर्माण होऊन रुग्णवाहिकेस ये जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे.
अतिक्रमण विभागाचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.रुग्णवाहिकेस रुग्ण नेताना उशीर झाल्यास यास जबाबदार कोण?तसेच आळंदी ग्रामीण रुग्णालय येथील दुसरे लोखंडी मेन गेट बंद करून संरक्षण भिंत का बांधण्यात आली ? यावर प्रश्न निर्माण होत ( Alandi ) आहे.