Team My Pune City – अनंत चतुर्दशीच्या दिवशी (Alandi)राज्यभरातील घरगुती तसेच सार्वजनिक मंडळातील लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.आळंदी शहरात ठिक ठिकाणी ढोल ताश्यांच्या पारंपरिक वाद्यात, तर कोणी पारंपरिक (संबळ) वाद्य वाजवत,महाकाल महाआरती डमरू वाद्यात,जिवंत देखावा सादरीकरण करत,गोव्यातील शिमगा सणाची परंपरा सादर करत तसेच कोणी आकर्षक पुष्पसजावट, विद्युत रोषणाई करत फटाक्यांच्या अतिषबाजीत गणरायाची विसर्जन मिरवणूक पार पडली.
घरगुती गणरायाचे विसर्जन करताना लहानापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व भावुक झाल्याचे दिसले.लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटले होते.अनेकांनी पालिकेच्या कृत्रिम पाण्याच्या हौदात विधिपूर्वक मूर्तीचे विसर्जन केले,व पालिका संकलन केंद्रात मूर्ती सपूद केली.
मूर्ती विसर्जन वेळी पूर्णपणे आळंदीतील इंद्रायणी घाट पालिकेच्या वतीने बंद करण्यात आला होता.तरी शहर परिसरातील काहींनी विहीर, तलाव,आडवाटेने नदी (च-होली ग्रामपंचायत हद्दीत) मध्ये मूर्तीचे विसर्जन केल्याचे दिसून आले.
Chinchwad: विसर्जन मिरवणुकी दरम्यान चिंचवड मध्ये अपघात, दोघेजण गंभीर जखमी
Rashi Bhavishya 7 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

आळंदी मधील धर्मराज ग्रुपने साडेतीन पीठ देवींचा,कडक लक्ष्मी,संबळ वाद्यात ,शिवतेज मित्र मंडळाने गोव्यातील शिमगा सण परंपरा,त्यामध्ये पालखी,पारंपरिक वाद्य,नृत्य व विविध वेशभूषा,जय गणेश प्रतिष्ठाण यांनी घराचे घरपण हरवलय समाज जागृती पर जिवंत देखावा,त्यामध्ये सद्यस्थितीत घरातील पालकांचे मुलांवर लक्ष,वेळ,प्रेम किती यावर प्रकाशझोत टाकला,तद्नंतर घरातील मुलगी प्रेम असणाऱ्या मुला बरोबर पळून जाऊन लग्न केल्यानंतर तिची अवस्था परिस्थिती,त्या मुलाने फसवल्या नंतर तिची परिस्थिती,व माहेरी आल्यावर आई वडील,मुलगी यांचे भावुक प्रसंग इ.सादर करण्यात आले.जय गणेश ग्रुपने बाराज्योतिर्लिंग, महाकाल आरती,डमरू नाद,नृत्य,नंदी, व्यापारी तरुण मंडळांने आकर्षक विठ्ठल रुक्मिणी ,जगद्गुरू संत तुकाराम महाराज फुलसजावट व ढोल ताश्यांच्यागजरात,ज्ञानराजा मित्र मंडळाने पावनखिंड माहिती पट चित्र ,पालखी ढोलताशा,शिवस्मृती प्रतिष्ठाण १५ फुटी लालबाग राजा मूर्ती,ढोल ताश्यांच्या गजरात,एकलव्य प्रतिष्ठानने ढोल ताश्यांच्या गजरात,आकर्षक सजावट,कै. बाबाशेठ मुंगसे पा.श्री हनुमान,वानर सेना जिवंत मानवी देखावा व ढोल ताश्यांच्या गजरात,सुवर्णयुग मित्र मंडळाने ढोल ताशांच्या गजरात,आकर्षक विद्युत रोषणाई, श्रींचे मंदिर ,न्यु दत्त ग्रुप ढोल ताश्यांच्या ,माऊली पार्क मित्र मंडळ ढोल ताश्यांच्या गजरात तसेच इतर बहुतेक गणेश मंडळानी सुद्धा गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत ढोलताशा व आकर्षक विद्युत रोषणाई केली होती.तर काही वारकरी संस्थेने टाळ मृदंनगाच्या गजरात मिरवणूक काढली.
जय गणेश प्रतिष्ठाण यांचा मिरवणूक जिवंत देखावा लोकांना भावला तर धर्मराज ग्रुप ,जय गणेश ग्रुप,शिवतेज मित्र मंडळ,मुंगसे पा. प्रतिष्ठाण, व्यापारी तरुण मंडळाची मिरवणूक लक्षवेधी ठरली.
विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.मिरवणुकी दरम्यान काही वेळ पावसाच्या हलक्या सरींचे आगमन झाले होते.