Team MyPuneCity – काल दि.23 रोजी दुपारी आळंदी शहरात वाहतूक कोंडी मुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.रस्त्याच्या कडेला दुतर्फा वाहने उभी केल्याने तसेच चालकांनी डबल लाईन केल्याने ही समस्या उद्भवली.एकादशी तसेच साखरपुडा समारंभ, लग्न सराई असल्याने काही नागरिकांनी वाहने रस्त्याच्या कडेलाच लावली होती.यामुळे वाहनांच्या रहदारी साठी रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली.वडगांव रस्तावर दोन किमी पर्यंत ट्रॅफिक जाम झाले होते.तसेच चाकण चौक, मरकळ रोड, प्रदक्षिणा मार्ग येथे वाहतूक वाहतूक कोंडीमुळे वाहनांचा रांगा लागल्या होत्या.वाहतूक कोंडी समस्याचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाले त्याची तत्काळ दखल वाहतूक विभाग यांनी घेत वाहतूक कोंडी सोडवण्याचे कार्य केले.
Khandala Car Fire : खंडाळा घाटात आडोशी बोगद्याजवळ धावत्या कारला अचानक आग; चालकाचा प्रसंगावधानाने जीव वाचला
एकादशी निमित्त दर्शनास आलेले काही भाविक तसेच लग्न सराई मुळे लग्नाला आलेले काही नागरिक हे कोणताही विचार न करता थेट रस्त्याच्या कडेला वाहने लावतात यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.असे यावेळी आरिफ शेख म्हणाले.
वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर म्हणाले रस्त्याच्या कडेला दुतर्फा वाहने उभी केल्याने व चालकांनी डबल लाईन केल्याने ही समस्या उद्भवली आहे.लग्न सराईतील धर्मशाळा,कार्यालय यांची पार्किंग व्यवस्थेचा विषय ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन मार्गी लावावा.
चाकण चौक येथील वाहनतळ व्यवस्था भाविकांसाठी अपुरी पडत आहे.त्यामुळे प्रदक्षिणा रस्ता तसेच इंद्रायणी नदी पलीकडील घाटा शेजारील रस्त्यावर वाहने पार्क केली जातात.
लग्न सराई मुळे काही धर्मशाळा ,कार्यालयात लग्न असली तरी त्यांची पार्किंग व्यवस्था अपुरी असते.यावर तोडगा काढणे आवश्यक आहे.आळंदीत मोठ्या सुसज्ज वाहनतळाची आवश्यकता भासत आहे.वडगांव रोड येथे वाहनतळ असून सुद्धा त्या वाहन तळामध्ये मोजकीच वाहने पार्क होत आहेत.याकडे प्रशासनाचे लक्ष हवे.तसेच स्थानिक आमदार, पोलीस प्रशासन व पालिका प्रशासन एकत्र येऊन यावर योग्य तो निर्णय घ्यावा अशी मते यावेळी सोशलमीडिया च्या माध्यतून मांडण्यात आली.
तसेच संध्याकाळी मरकळ रस्ता येथे के के हॉस्पिटल जवळील वडगांव रस्त्याकडे जाणाऱ्या बाह्य मार्गावर बेशिस्तपणे चालक कोणत्याही विचारांची पर्वा न करता रस्त्यावर वाहनांची वळणे घेत असल्याने काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.दीड दोन मिनिटे रुग्णवाहिका या कोंडीत अडकली होती.एका नागरिकाने तिला वाट मोकळी करून दिली.व वाहतूक पोलीस यांनी तत्काळ लक्ष देत काही मिनिटात तेथील वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.