Team MyPuneCity –संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान यंदा घुंडरे घराण्याला भेटला आहे.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाला बैल जोडी ओढण्याचा मान घुंडरे कुटूंबियांना मिळालेला आहे.हा मान मिळाल्याने त्यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे.विवेक ज्ञानेश्वर घुंडरे,जनार्दन घुंडरे,अर्जुनराव मारुती घुंडरे ,सचिन बाळासाहेब घुंडरे यांना हा मान मिळालेला आहे.
विवेक घुंडरे यांनी जि सातारा ,बावधन येथून राजा प्रधान बैल जोड बाळासाहेब कदम यांस कडून सहा लाख रु.खरेदी केला आहे. तसेच दुसरा बैलजोड(सावकार,संग्राम)हिंजवडी येथून उमेश साखरे यांसकडून पाच लाख रु.खरेदी केला आहे.
Pune: ख्रिश्चन समाजावरील अत्याचार थांबवा, व राजकीय प्रतिनिधित्व, स्वतंत्र महामंडळ द्या -पी विल्सन

अर्जुनराव मारुती घुंडरे व सचिन बाळासाहेब घुंडरे यांनी नांदेड सिटी येथून 5लाख 51 हजार रु.बैल मल्हार ,आमदार ही बैलजोडी निखिल कोरडे यांस कडून खरेदी केला.तसेच दुसरा बैल जोड (माऊलीं शंभू )उत्तम नगर येथून मुरलीधर नाणेकर यांसकडून 2 लाख 51 हजार रु.खरेदी केला आहे.

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ सोहळ्यासाठी बैलांचा शेती मशागत,बैलगाडी ओढणे इ. सराव होत आहे.या बैलांसाठी खुराक शाळूची वैरण,हिरवा चारा,पेंड,खारीक खोबऱ्याचा भुगा,बैल खाद्य मिक्स इ.देत आहेत. बैल मानकरी यांनी यावेळी माहिती सांगितली.दि.2 रोजी या बैल जोडीचे पूजन, मिरवणूक होणार असून जास्तीत जास्त आळंदीकरांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे मानकरी यांनी आवाहन केले आहे.