Team My pune city – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचे उद्या दि.२० रोजी आळंदीमध्ये (Alandi) आगमन होणार आहे. याच निमत्ताने आळंदी शहरातील चाकण चौक पुलावरील व पूलाजवळील खड्डे आळंदी नगरपालिकेच्या वतीने बुजवण्यात येत आहे.

Crime News : महिलेचा मोबाईल आणि दुचाकी मित्राने जबरदस्तीने हिसकावली
तसेच इंद्रायणी घाटावरील राडा रोडा उचलण्यात येत असून तेथील परिसर नीट नेटका करण्याचे काम पालिकेच्या वतीने सुरू आहे. चाकण चौक पुलावरील व पुला जवळील खड्डे बुजविण्यासाठी तो पुल काही वेळा करीता वाहतुकी साठी बंद करून इंद्रायणी नगर रस्त्या मार्गे केळगाव बायपासने वळवण्यात आली होती.

रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम चालू असल्याने शहरात काही वेळ वाहतूक समस्या निर्माण झाली होती.माऊलीं व जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी उद्या शहरात येणार असून ठिक ठिकाणी पालखी स्वागतासाठी तयारी होत (Alandi) आहे.