Team MyPuneCity – ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचे व्रत केले जाते. आज वटपौर्णिमेनिमित्त आळंदीमध्ये विश्रांतवड, सिद्धबेट ठिक ठिकाणी असणाऱ्या वडांच्या झाडांचे मनोभावे पूजा महिला करत होत्या व वडाच्या झाडाला सूत गुंडी वडाला बांधून प्रदक्षिणा घालत होत्या. पती-पत्नीचे नाते सात जन्म टिकावे यासाठी ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमेला सर्वच सुवासिनींनी वडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातले.या दिवशी महिला पतीसाठी उपवास ही करतात.
Audi : ऑडी इंडियाकडून ऑडी ए४ सिग्नेचर एडिशन लाँच
तर काही महिलांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून वड वृक्षाचे वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनाचे संदेश दिले. वडाच्या झाडा मध्ये ऑक्सीजन प्रमाण जास्त आहे. वडाची पाने,साल यासारखे भाग औषधी म्हणून वापरल्या जातात याबद्दल सविस्तर माहिती देत ते शेअर करण्यात येत होती. वटपौर्णिमेनिमित्त अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश देत होते.
“मराठी संस्कृतीची प्रतिमा
सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण
बांधूनी नात्याचे बंधन
करेन साता जन्माचे समर्पण
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा”
“सण सौभाग्याचा, बंध हा अतूट नात्याचा
या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा”