Team MyPuneCity –संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी प्रस्थान सोहळा १९ जूनला पार पडणार आहे.या निमित्ताने लाखो भाविकांचे अलंकापुरीत आगमन होत असते.या प्रस्थान सोहळ्यास अवघा पाऊण महिना बाकी आहे.या आषाढी वारीच्या अनुषंगाने माऊलींच्या रथाची सराव चाचणी केली जात आहे. आज शहरात सकाळी पावणे बाराच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली.शहरातील ठिक ठिकाणच्या रस्त्यांवर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत होते.
Pune: पुण्यात भारतीय प्राणी संशोधन संस्थेच्या हॅकाथॉन स्पर्धेत नवकल्पनांचा झंझावात; 110 तासांच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
शहरात दमदार पावसाने हजेरी लावली असली तरी या पावसात माऊलींच्या रथाची काही ठिकाणी टॅक्टरने तर काही ठिकाणी माणसाने रथ ओढत सराव चाचणी घेण्यात आली.या रथाची भक्त निवास ते साई मंगल कार्यालय,साई मंगल कार्यालय ते भक्त निवास अशी सराव चाचणी टॅक्टर जोडून तर कुठे ग्रामस्थ कर्मचारी यांच्या सहाय्याने करण्यात आली. पावसात ही रथ ओढण्याचा उत्साह ग्रामस्थ कर्मचाऱ्यां मध्ये दिसून येत होता.
Alandi: पावसातही माऊलींच्या रथाच्या सराव चाचणीचा उत्साह
