Team My pune city – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज(Alandi) सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सवा निमित्त सुवर्ण कलशारोहणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमतः माऊलीं मंदिर येथील महाद्वार जीर्णोद्धार निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाद्वार जीर्णोद्धार कार्यारंभ पूजन सोहळा पार पडला. तद्नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुवर्ण कलशाचे पूजन करण्यात आले.
शांतीब्रम्ह मारोती बाबा कुरेकर, डॉ. नारायण महाराज जाधव (Alandi)यांच्या शुभहस्ते हे कलशारोहण करण्यात आले.कार्यक्रमा दरम्यान दुभाषिक ज्ञानेश्वरीचे ऑडिओ बुक प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडला.
सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सवा निमित्त माऊलींचा रथोत्सव
काल सायंकाळी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर(Alandi) सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सवा निमित्त हरिनाम गजरात,फटाक्यांच्या अतिषबाजीत माऊलींच्या रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदक्षिणा मार्गावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.तसेच मंदीर व मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरात आकर्षक फुलसजावट करण्यात आली होती.पालिकेच्या वतीने श्रींच्या रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
श्रीकृष्ण व संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
श्री कृष्ण जन्मोत्सव व संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव (Alandi)निमित्त माऊलीं मंदिरात रात्री १० ते १२ कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.दरम्यान सर्व भाविकांना पुष्प वाटण्यात आली.रात्री बारा वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सवावेळी भाविकांनी माऊलींवर पुष्पवृष्टी केली.
तद्नंतर हजारो माऊलीं भक्तांनी टाळ्यांचा कडकडाट करत माऊलींचा जयघोष केला.तद्नंतर श्रींची आरती
झाली.मानकऱ्याना नारळ, प्रसाद वाटप करण्यात आला.भाविकांना सुंठवटा प्रसाद म्हणून वाटण्यात आला.मंदिरात माऊलीं भक्तांकडून खिरापत वाटण्यात आली.
माऊलींच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सवा निमित्त सुवर्ण कलशारोहण
काल दि.१५ रोजी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज(Alandi) संजीवन समाधी मंदिरावर २२ किलोच्या सुवर्ण कलशारोहण सोहळा संपन्न झाला.माऊलीं मंदिरात कार्यक्रम असल्याने मोजक्याच चारशे च्या आसपास नागरिकांना यावेळी निमंत्रित करण्यात आले होते.
Chapekar Brothers Museum : स्वयंशिस्तीतून देशाला वैभव प्राप्त होईल – मुकुंद कुलकर्णी
ज्या देणगीदारांनी एक लाख व एक लाखा पुढील रक्कम दिली त्यांना २० ग्रॅम च्या श्रींच्या पादुका संस्थानच्या वतीने देण्यात येणार असल्याचे विश्वस्त चैतन्य महाराज कबीर यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रम सोहळ्या प्रसंगी माहिती देताना विश्वस्त चैतन्य महाराज कबीर म्हणाले सर्व देणगीदार, भाविक भक्त,
वारकऱ्यांच्या सहयोगाने केवळ २९ दिवसात २२ किलोचा,२२ कोटी रु.चा हा सुवर्ण कलश ज्ञानदेवांच्या चरणी समर्पित करत आहोत.ज्या देणगीदार(Alandi)यांनी सेवा अर्पण केली.त्यांचा संस्थान कमिटी गौरव करणार आहे.
Vadgaon Maval : सामाजिक कार्यकर्ते अशोक घोजगे यांचे निधन
दत्ताश्रम संस्थान जालना येथून ताई महाराज यांचा फोन आला.११ किलोचा संकल्प आहे. त्यांनी १२ किलो सुवर्ण दिले.संकल्प कठीण आहे पण अशक्य नाही(Alandi) याची प्रचिती आली .महाद्वार यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते जीर्णोद्धार कार्यारंभ पूजन झाले. 1750 नंतर छत्रपती शिवरायांचे साम्राज्य अटके पर्यंत पोहचले.
आणि ज्ञानदेवांचे निसिम भक्त असलेले गळ्यात तुळशीची माळ,कपाळावर ज्ञानदेवांचा गोपीचंदा सारखा टिळा नित्य धारण करणारे श्रीमंत महादजी शिंदे यांनी ज्ञानदेवांचे महाद्वार व नगारखाना बांधला.
याचा जीर्णोद्धार अडीशे वर्षांनी त्यांच्या (Alandi) कुळातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. हे सर्व चार कोटी रुपयांचे काम महाराष्ट्रातील ख्यातनाम व्यावसायिक आर के चव्हाण यांनी देणगीतून ज्ञानदेवांच्या समर्पित केले.