Team MyPuneCity –च-होली खुर्द येथील सुयश मंगल कार्यालय जवळील आळंदी मरकळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा पडला होता .दुचाकी व छोट्या मोठ्या वाहनांना तो खड्डा धोकादायक ठरत होता.जोरदार पाऊस झाल्याने त्या ठिकाणच्या खड्ड्यात पाणी साचते होते .त्या रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज न आल्याने तेथील खड्ड्यात वाहनांची चाके आदळत होती.
त्यामुळे वाहनांचे स्पेअर पार्ट निखळणे,ब्रेकर लायनर निकामी होणे याची शक्यता होती. दुचाकीस्वारांना तेथून वाहन चालवण्यासाठी कसरत करावी लागत होती.दुचाकी स्वारांना त्या खड्ड्यामुळे पाठीचे , मणक्याचे आजार होण्याची शक्यता होती.
रस्त्यावर आडवा पूर्णपणे खड्डा व रस्त्याच्या कडेला सुद्धा एका बाजूने खड्डा असून त्यात पाणी साचलेले अशी परिस्थिती तिथे होती. मुख्य रस्त्यावर खड्डा पडल्याने रहदारी साठी त्याचा अडथळा निर्माण होत होता.याबाबत चे व्हिडिओ व वृत प्रसारित झाले होते.
Alandi: उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी वारी पूर्वनियोजन बैठक संपन्न
याची दखल घेत च-होली खुर्द येथील सुयश मंगल कार्यालय जवळील रस्त्यावरील व कडेचा धोकादायक खड्डा रॅबिट व क्रशसॅण्ड ने आळंदीतील नागरिकांने स्वखर्चाने बुजवला.तसेच त्या शेजारील समाजकार्य म्हणून तो खड्डा बुजवण्यात आल्याचे यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात आले.तो धोकादायक खड्डा बुजवल्याने नागरिकांनी त्या कार्याचे कौतुक केले आहे.
