Team My Pune City –५ सप्टेंबर देशाचे राष्ट्रपती (Alandi )डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस देशभरात शिक्षक दिन म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आळंदी येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज तसेच श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर व श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर मधील सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांचा ‘यशोगाथा’ हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या आरंभी संत ज्ञानेश्वर महाराज व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. ज्ञानेश्वर जाधव, ज्यांच्या हस्ते शिक्षकांचा सन्मान संपन्न झाला असे हिंजवडी, ता. मुळशी जि. पुणे चे सरपंच सुरेश हुलावळे तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले पिंपरी चिंचवड परिसरातील प्र.बांधकाम व्यावसायिक नंदकुमार साळुंखे, मा. जिल्हा परिषद सदस्या स्वाती हुलावळे, बाळासाहेब बालवडकर समवेत श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, संस्था सदस्य अनिल वडगावकर ,आळंदी वि. का. सो.चे चेअरमन बाबुलाल घुंडरे, विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, सर्व विभागातील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये सचिव अजित वडगावकर यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेची यशस्वी परंपरा, संस्था / विद्यालय व विद्यार्थ्यांच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर व्यक्तिमत्त्वांचा, त्यांच्यातील कलागुणांचा व कार्याचा यानिमित्ताने संस्थेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्याचा समारंभ संपन्न झाला.
नंतर नंदकुमार साळुंके, सुरेश वडगावकर, डॉ. दीपक पाटील, सूर्यकांत मुंगसे, प्रमोद कुलकर्णी यांनी 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याला उजाळा देत वर्ग नावाच्या मैफिलीतील खरे कलावंत म्हणजे शिक्षक. अशा सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून शुभेच्छा दिल्या.
Vadgaon Maval Court : वडगाव मावळ न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीच्या कामास मंजुरी; इमारत बांधणीसाठी १०९ कोटी ८ लक्षांचा निधी
Ganesh Visrajan : गणेश विसर्जनानंतर मुर्तींचे छायाचित्रण व प्रसारणास करता येणार नाही

तर नंतर सुरेश हुलावळे व स्वाती हुलावळे यांनी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था रुपी छोटसं रोपट याचं मोठ्या वटवृक्षात रूपांतर करण्याकरिता ज्यांनी कष्ट घेतले असे सचिव अजित वडगावकर, सर्व संस्था पदाधिकारी व शिक्षक वृंद यांचे अभिनंदन केले. एकंदरीत संस्थेचे हे वैभव पाहून मन भारावून गेल्याचे सांगितले. आजचा विद्यार्थी हा उद्याचा समाज व देश घडविणारा असल्याने त्याला योग्य ते ज्ञान व संस्कार द्यावेत असे शिक्षक दिनाच्या निमित्ताने विचार व्यक्त करण्यात आले.
तसेच जेथे आपण शिकलो ज्ञान व संस्काराने मोठे झालो अशा ज्ञान मंदिराला कधीही विसरू नये, आयुष्यात जेव्हा कधी कर्तबगार बनू तेव्हा त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करावी असे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या. शेवटी अध्यक्ष मनोगतामध्ये ज्ञानेश्वर महाराज जाधव यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यातील उद्दात व्यक्तिमत्व विषयी सखोल माहिती देत सबंध शिक्षकांचा जन्म हा त्याग व समर्पणातून समोर आलेला असल्याचे सांगितले. म्हणून सर्व गुरूंनी ग्रंथाविषयी निष्ठा ठेवावी व बालमनावर चांगले संस्कार व सखोल ज्ञान रुजवण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले. भारतीय संस्कृतीत शिक्षण प्रणाली प्राचीन काळापासून कशाप्रकारे वृद्धिंगत झाली याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमांगी उपरे व राहुल चव्हाण यांनी केले व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार प्रदीप काळे यांनी व्यक्त केले. माऊलींच्या पसायदानाने कार्यक्रमाचे सांगता झाली. शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना नाश्ता, चहा – पाणी व स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली.