Team My Pune City -आळंदी पोलीस ठाण्यात सन २०२१ मध्ये दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील एका आरोपीला राजगुरूनगर खेड अतिरिक्त सत्र न्यायालयाने सात वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. संतोष वासुदेव घुंडरे (३५, आळंदी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, संतोष घुंडरे याच्या विरोधात सण २०२१ मध्ये खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या विरोधात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय राजगुरूनगर येथे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या केसमध्ये साक्षीदारांची सरकारी अभियोक्त्यांनी साक्ष नोंदवली.
Siddha Ganesh Dhol Pathak : श्री सिद्ध गणेश ढोल ताशा पथकाचा वाद्यपूजन सोहळा व सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
PCMC:महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते पे ऍन्ड पार्क आणि व्हॉट्सऍप पार्किंग सुविधेचे उद्घाटन
घुंडरे याच्या विरोधात सबळ पुरावे आढळल्याने न्यायालयाने त्याला सात वर्ष सक्त मजुरी, एक लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावास, तसेच धमकी दिल्याच्या कलमाखाली एक वर्ष सक्त मजुरी आणि एक हजार रुपये दंड. दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. आरोपी घुंडरे याला येरवडा कारागृहात जमा करण्यात आले आहे.