Team My pune city – बेपत्ता असलेल्या महिलेची चप्पल जोडी व एक चिठ्ठी असलेले पाकीट आज सकाळी आळंदी घाटावर मिळाल्याने आळंदी नगरपरिषद ,आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने नदीपात्रात शोध मोहीम सुरू करण्यात आली (Alandi) आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी माहिती दिली की, आज सकाळी आळंदी घाटावर एक चप्पल जोडी व एक चिठ्ठी असलेले पाकीट मिळाले होते. त्यावर फक्त मनीषा रमेश शेलार असे लिहीलेले आहे. तसेच नवलाख उंबरे ते निगडी असे कालचे बस (Alandi) तिकीट होते.
त्यावरून आम्ही तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनकडून या महिलेबाबत माहिती प्राप्त केली असता सदरची महिला ही तेथील रहिवासी असून ती कालपासून बेपत्ता आहे. त्यांना कोणी आत्महत्या करताना पाहिलेले नाही. परंतु चिठ्ठीवरून आम्ही त्यांचा सकाळपासून नदी पात्रात सुद्धा शोध घेत आहोत. त्यात नगरपरिषद सुद्धा मदत करीत आहे. अधिक माहिती लवकरच दिली जाईल ,असे (Alandi) सांगितले.