Team MyPuneCity -संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सन २०२५ चा प्रस्थान सोहळा कार्यक्रमाची माहिती देवस्थानच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.
उद्या दि.१९ रोजी पहाटे ४ वा. घंटानाद, पहाटे ४:१५ काकडा,पहाटे ४:१५ ते ५:३० वा.पर्यंत पवमान अभिषेक, पंचामृत महापूजा, व दुधारती, पहाटे ५ ते सकाळी ९ भक्तांच्या पादुकांवर महापूजा व समाधी दर्शन ,९ ते १२ भाविकांना श्रींचे दर्शन,९ ते ११ वीणा मंडपात कीर्तन, दु.१२ ते १२:३० गाभारा स्वच्छ करणे, समाधीस पाणी घालणे व श्रींना महानैवद्य , दु.१२:३० ते ३ पर्यंत भाविकांना श्रींचे दर्शन घेता येणार आहे.सायंकाळी ५ ते ७ गुरुवार निमित्त पालखी मिरवणूक,६ ते ६:३० प्रस्थान सोहळ्याच्या ४७ दिंड्यांना आत घेण्यास सुरुवात होणार,रात्री ८ वाजता पालखी प्रस्थान सोहळ्या वेळी श्री गुरु हैबतराव बाबा यांचे तर्फे श्रींची आरती,संस्थान तर्फे श्रींची आरती, मानक-यांना नारळ प्रसाद वाटप होईल. वीणा मंडपात ठेवलेल्या पालखी मध्ये श्रींच्या चल पादुकांचे प्राण प्रतिष्ठापणा होईल,संस्थान तर्फे मानक-यांना मानाची पागोटी वाटप करण्यात येणार आहे.श्रीगुरु हैबतराव बाबा तर्फे दिंडी प्रमुख, प्रतिष्ठित ,मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात येईल.
Kundmala Bridge Update : कोसळलेल्या साकव पुलावर अडकलेल्या सात दुचाकी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दोरखंडांनी बाहेर काढल्या
श्रींचे समाधीजवळ नारळ वाटप ,श्रींच्या पालखीचे वीणा मंडपातून प्रस्थान ,मंदिर प्रदक्षिणा करून पालखी महाद्वारातून प्रदक्षिणामार्गे भरावरस्ता- भैरवनाथ चौक – हजेरी मारुती – चावडी चौक – महाद्वार चौकातून दर्शन मंडप मुक्कामी पोहचेल. आजोळ घरात श्रींची समाज आरती होईल.
रात्री ११ ते पहाटे ४:३० जागर कार्यक्रम होईल.
