Team My pune city – सोमवार दि. 11 ऑगस्ट 2025ध्यास फौंडेशन संचलित महर्षी वाल्मिकी बालकमंदिर, महर्षी वाल्मिकी विद्यावर्धिनी व डॉ.माधवराव सानप विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय प्रशालांत (Alandi) रक्षाबंधनाचा सण यंदा हरित संदेश तर साजरा करण्यात आला. संस्थेच्या संचालिका अक्षता कुलकर्णी व सर्व शिक्षकांनी शाळा परिसरातील वृक्षांना राख्या बांधून त्यांचे रक्षण करण्याचा संकल्प केला.
Mahavitaran: वीजबिलाच्या ‘नावात बदल’ आता घरबसल्या
यानिमित्ताने संस्थेच्या संचालिका यांनी राखी बांधताना वृक्षांचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेबाबत जागृती केली या उपक्रमातून वृक्ष व निसर्गाशी जवळचे नाते जपण्याचा (Alandi) संदेश त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिला.

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर ट्रॅफिक वॉर्डनला मारहाण
या सोहळ्यास संस्था संचालिका अक्षता कुलकर्णी, संस्था व्यवस्थापक गोपाल उंबरकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या शाब्दिक स्वागताने कार्यक्रमास (Alandi) सुरुवात झाली. मुलींनी स्वतः तयार केलेल्या राख्या मुलांना बांधल्या व बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन दिले.
या कार्यक्रमात बालवाडी ते आठवी मधील सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार मयुरी तौर यांनी मानले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी शिर्के यांनी केले. आनंदमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात (Alandi) आली.