Team My Pune City -आळंदीत मध्ये संध्याकाळी सातच्या सुमारासपावसाने(Alandi) जोरदार हजेरी लावली. शहरातील वडगांव रोड,मरकळ रस्ता,नगरपरिषद चौक अश्या ठिक ठिकाणच्या रस्त्यांवरून पाणी वाहत होते.पाऊस सुरू असल्याने काही वेळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.
पावसामुळे शहरातील गणेश देखावे पाहणाऱ्या नागरिकांच्या उत्साहावर विरजण पडले दिसून आले. पावसामुळे मंडळांनी तयार केलेले देखावे पाहण्यास गर्दी होत नव्हती. जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांना गणेश दर्शनासाठी बाहेर पडणे कठीण झाले होते.
Pune: ‘दगडूशेठ’ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण व महाआरती
Atharvashirsha Pathan : श्रीसमर्थ सेवा समिती व श्री योगीराज सेवा फाउंडेशनच्यावतीने बालगोपालांसाठी गणपती अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन

गणेशोत्सवा निमित्त शहरातील काही गणेश मंडळे लहान मुलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करत असतात.परंतु पावसामुळे आज च्या त्या स्पर्धा होऊ शकल्या नाही.
ऋषी पंचमी व्रत पूजे निमित्त दुपारी महिलांची इंद्रायणी काठी मोठी गर्दी दिसून येत होती.यावेळी अनेक भाविकांनी इंद्रायणी नदी मध्ये स्नान केले.