Team My Pune City – यंदाचा गणेशोत्सव अवघ्या दोन ( Alandi) दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वत्र लाडक्या गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.शहरातील बाजारपेठां मध्ये गणेशमूर्ती व सजावट साहित्य खरेदी करताना नागरिक दिसत आहे.गणेशोत्सवा निमित्त आळंदी शहरात सर्वत्र उत्साह पसरला आहे.शहरातील विविध मंडळांनी मंडप उभारला असून देखाव्यांचे कार्य अंतिम टप्प्यात आहे.
Lonavala News : लोणावळ्यात दोन दिवसांत 220 वाहनांवर कारवाई; तब्बल 1.81 लाखांचा दंड वसुल
ठिक ठिकाणच्या मंडळांमध्ये देखाव्यांच्या कार्यात कार्यकर्ते मग्न ( Alandi) दिसून येत आहेत. श्रीमुर्ती सह भव्यसभा मंडप,विद्युत रोषणाई, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच पौराणिक व सद्यस्थितीवर आरास गणेश उत्सवातील वैशिष्ट्य ठरते. आळंदी शहरात विविध मंदीराच्या प्रतिकृती ,आकर्षक विद्युत रोषणाई इतर देखावे त्याची रंगरंगोटी यांचे कार्य अंतिम टप्प्यात आले असून त्या कार्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे.
Pune: ‘नाचून नाही, तर वाचून गणेशोत्सव साजरा करा’
मंडप उभारणी नंतर मंडळांच्या कार्यकर्त्यांची आपल्या मंडळाची ( Alandi) आकर्षक सजावट लोकांच्या पसंतीस उतरावी म्हणून सजावटीकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे.शहरातील अनेक मोठया व बाल गणेश मंडळांनी गणेशमूर्ती मुर्ती विक्रेत्यांकडे सुबक ,सुंदर गणेशाची मुर्ती बुकिंग केली आहे. २७ ऑगस्ट रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे.सर्वत्र लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन होणार आहे.
यानिमित्ताने सजावटीच्या वस्तू घेण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी होत आहे. दिव्यांच्या माळा, तोरणे,विविध प्रकारची मखरे आणि हस्त निर्मित कलाकृतींची विक्री होत आहे.श्रीगणेश मूर्ती विक्रीची अनेक ठिकाणी दुकाने लागली असून नागरिक आकर्षक,सुंदर अश्या गणेश मूर्तीची बुकिंग करत आहेत.पूजेसाठी लागणाऱ्या साहित्य वस्तूंची ठिक ठिकाणी दुकाने उद्या पासून ( Alandi) लागतील.